Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Bull Attack Viral Video: गुलाबी साडी नेसलेल्या महिलेवर अचानक केला वळूने हल्ला, बघा पुढे काय झालं?

Shocking Viral Video: सोशल मीडियावर दिल्लीतील एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एका महिलेवर वळूने हल्ला केलेला आहे.

Tanvi Pol

Bull Attacks Viral Video: गेल्या काही वर्षात रस्त्यावरील भटक्या प्राण्यांच्या नागरिकांवर हल्ले वाढलेले आहेत. अनेकदा अनेकांचा या प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू होतो तर काहीजण गंभीर जखमी होतात. त्यातच पुन्हा एकदा अशीच एक घटना घडली आहे. ज्यात घटनेत रस्त्यावरुन जाणाऱ्या महिलेवर वळून हल्ल्या केलेला आहे. संपूर्ण धक्कादायक घटना रस्यावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली असून याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत एक गल्लीतील रस्ता दिसत आहे. या रस्त्यावर एक महिला जात आहे आण तिच्या समोरुन एक वळू जात आहे. मात्र महिला वळूच्या दुसऱ्या बाजूने जात असताना अचानक वळू उधळतो आणि त्या महिलेवर धावून जातो. मात्र तात्काळ त्या परिसरात(premises)असलेले अनेक व्यक्ती महिलेची मदत करण्यासाठी तिथे धावून जातात. अथक प्रयत्नानंतर महिलेला वळूच्या हल्ल्यातून वाचवतात आणि वळूला तेथून पळवून लावतात शिवाय महिलेला ही तेथून घेऊन जाताना दिसत आहेत.

धक्कादायक घटना दिल्लीतील असल्याचे समजत आहे. मात्र संपूर्ण व्हिडिओ ''एक्स'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@gharkekalesh'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ शेअर होताच मोठ्या प्रतिक्रिया दिलेल्या असून व्हिडिओला असंख्य व्ह्यूज मिळाले आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सदाभाऊ खोत यांनी केले बाळराजे पाटलांचे समर्थन

SUV 2026: फीचर्स फुल्ल, स्टाइल कमाल! मार्केटमध्ये धुमाकूळ घालायला सज्ज 5 दमदार मिड–साईज SUV; खासियत ऐकून थक्क व्हाल

Shocking: लग्नात फोटोसेशन सुरू असताना स्टेज कोसळला, नवरा-नवरी, भाजप नेत्यासह १० जण पडले; पाहा VIDEO

Solapur News: सूचना एक कानानं ऐकली दुसऱ्या कानाने सोडली; आगार प्रमुख 'ऑन द स्पॉट सस्पेंड'

Maharashtra Politics: 2 डिसेंबरपूर्वीच राजकीय भूकंपाचा ट्रेलर! शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदेंच्या स्टेजवर|VIDEO

SCROLL FOR NEXT