Bull Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Bull Viral Video: पिसाळलेला बैल थेट घरात शिरला; बायकांना दिलं उडवून, थरारक घटनेचा VIDEO व्हायरल

Ruchika Jadhav

Viral Video:

प्रत्येक गावात दरवर्षी बैलगाडा शर्यत असतेच. या शर्यतीमध्ये शेतकरी आपल्या बैलांना मस्त सजवतात आणि शर्यतीत उतरवतात. या शर्यतीमध्ये एखादा बैल पिसाळला तर त्याला शांत करताना भल्या भल्यांना घाम फुटतो. सध्या सोशल मीडियावर असाच एका बैलाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात बैलामुळे नागरिकांची मोठी पळापळ झालीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडियावर सध्या या घटनेचा एक व्हिडीओ (Video) व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक बैल जोरजोरात पळत सुटलाय. बैल पळत सरळ गावात वस्तीत शिरलाय. या बैलाला थांबवण्यासाठी गावकरी त्याच्यामागे पळत आहेत. पळत पळत हा बैल थेट एका घरात शिरतो.

बैल ज्या घरात शिरतो त्या घराबाहेर काही महिला उभ्या असतात. बैल आपल्याकडे धावत येईल याची त्यांना काहीच कल्पना नसते. अशात बैल थेट या महिलांच्या अंगावर धावून जातो. अंगणात बैल यातील काही महिलांना आपल्या पायांनी उडवून देतो. बैल (Bull) आल्याने बायका आरडाओरडा करत आपला जीव वाचवून पळू लागतात.

यातील काही बायका जीव वाचवण्यासाठी थेट घरात शिरतात. बायकांना घरात गेलेलं पाहून बैल देखील घरात शिरतो आणि पुन्हा बायका घराबाहेर पळतात. या सर्व गोंधळात काही व्यक्ती जखमी झाल्या असाव्येत. कारण बैलाने अनेक व्यक्तींना आपल्या शिंगांनी आणि पायांनी उडवून दिल्याचं दिसतंय.

@hori__habba__abhimanigalu या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबर रोजी व्हिडीओ पोस्ट केला असून आतापर्यंत या व्हिडीओवर लाखोंच्या घरात व्ह्यूज आलेत. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर काळजी आणि भीती व्यक्त केलीये. तसेच काहींनी हसण्याचे इमोजी देखील पाठवलेत.

जो व्यक्ती वरती बसून व्हिडीओ काढतोय त्याला असं काही होणार हे आधीच माहिती असणार, अशी कमेंट एकाने केलीये. तर आणखी एकाने बैलगाडा घरात राडा असं म्हटलंय. नवऱ्याला बैल बोलणार का? बैल असा असतो हे दाखवण्यासाठी बरोबर तिथे गेला तो, असंही एकाने म्हटलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT