Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भाजपचे निष्ठावान म्हणून ओळख, पण बंडखोरी करण्याची आली वेळ, ढसाढसा रडले ब्रिजभूषण पाझरे; VIDEO

Viral News Video: सोशल मीडियावर सध्या भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा लोटांगण घालताना आणि ढसाढसा रडतानाचा व्हीडिओ मोठा व्हायरल होत आहे. नक्की काय घडले असेल व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Viral Video: सध्या राज्यभर दिळाळीचा उत्साह दिसून येत आहे त्याच प्रमाणे राज्यातील प्रत्येक ठिकाणी निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहे. राज्यातील गाव-गावात तुम्हाला अनेक उत्साही कार्यकर्ते दिसून येत आहे. सोशल मीडियावर आपल्याला अनेक निवडणुकी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यातच सोशल मीडियावर चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील एका उमेदवार आहेत. ज्यात ते एका प्रसंगामुळे भररस्त्यात रडताना दिसत आहेत. नक्की काय घडले ते तुम्ही पाहा.

नेमके काय घडले?

उमेदवारी अर्ज (application) भरायला जात असताना जुना मित्र समोर दिसताच पाझारे यांचा संयम सुटला आणि मित्राच्या पायावर लोटांगण घातले. कार्यकर्त्यांनी त्यांना उचलले. पण तोपर्यंत त्यांचे डोळे भरून आले. ते मित्राच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडले. आता हा व्हीडिओ (VIDEO) चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओत ब्रिजभूषण पाझारे हे अनेक र्यकर्त्यांसोबत चालताना दिसत आहे. मात्र काही वेळात ब्रिजभूषण पाझारे यांना रस्त्यावरुन जात असताना त्यांचा जुना मित्र भेटतो त्यात पुढे व्हिडिओत दिसेल की त्यांच्या मित्र त्यांना दिसताच ब्रिजभूषण पाझारे हे मित्राच्या पायावर डोकं ठेवून ढसाढसा रडताना दिसून येत आहे. व्हिडिओत नंतर दिसेल की त्यांच्या मित्र त्यांना उठवतो मग ते त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून पुन्हा रडण्यास सुरुवात करतात. संपूर्ण व्हिडिओ तेथील एका कार्यकर्त्यांने मोबाईलवर कैद केलेला आहे. ब्रिजभूषण पाझारे यांचा व्हिडिओ युट्युब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र तो व्हिडिओ युट्युबवरील ''@saamtv'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे.

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाची भाजपची उमेदवारी ब्रिजभूषण पाझरे यांना मिळावी, यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी ताकद लावली. मात्र, किशोर जोरगेवार यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाला टोकाचा विरोध करणाऱ्या पाझारे यांनी अखेर बंड केले. पाझारे यांनी नामांकन अर्ज दाखल केला. नामांकन अर्ज दाखल करायला जात असताना पाझारे भावूक झाले आणि ढसाढसा रडलेत. अनेक वर्षापासून ते भाजपमध्ये सक्रिय आहेत. त्यामुळे चंद्रपूर मतदारसंघात त्यांनी कार्यकर्त्यांची एक फळी निर्माण केली आहे. पाझारे यांचे बंड शमवण्यात भाजपला अपयश आले तर जोरगेवार यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Winter Foods: हिवाळ्यात भारतातील या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत आहात का? 'हे' पदार्थ नक्की खाऊन बघा..

Samosa Recipe: घरच्या घरी नाश्त्याला बनवा खुसखुशीत समोसा; बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे द्याल सोडून

Maharashtra Politcs : निकालाच्या आदल्या दिवशी भाजपला मोठा धक्का; मुंबईतील बड्या नेत्याने हाती धरली उद्धव ठाकरेंची मशाल

SCROLL FOR NEXT