Stunt Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: स्विमिंगपूलमध्ये शायनिंग मारायला गेला अन् धाडकन डोक्यावर आपटला; काळजात धडकी भरवणारा VIDEO

Stunt Viral Video: बऱ्याच व्यक्ती स्विमिंग करताना खतरनाक स्टंट करतात. त्यापायी अनेकांचे जीवही जातात तसेच गंभीररीत्या जखमी होतात. अशाच एका स्टंटचा व्हिडिओ सोशल प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Boys swimming Stunt Video

लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत अनेकजण स्विमिंग करण्याचा आनंद लुटत असतात. शरीराच्या तंदुरुस्तीसाठी स्विमिंग करण चांगलं मानलं जातं. बऱ्याच व्यक्ती स्विमिंग करताना खतरनाक स्टंट करतात. त्यापायी अनेकांचे जीवही जातात तसेच गंभीररीत्या जखमी होतात. अशाच एका स्टंटचा व्हिडिओ सोशल प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल व्हिडिओत दिसते की, घरापाठील बाजूस लहान आकाराचा स्विमिंग पूल आहे. या स्विमिंग पूलमध्ये एक तरुण स्टंट करत असतो, तेव्हा स्टंट करण्यासाठी तरुण स्विमिंग पूलच्या बाजूला असलेल्या उंच भिंतीवर उभा राहतो. त्यानंतर स्विमिंग पूलमध्ये उडी मारतो. मात्र स्विमिंग पूलमध्ये स्टंट करण्याचा त्याच्या अंदाज चुकतो अन् सरळ स्विमिंग पूलच्या बाजूला असलेल्या खालच्या कठड्यावर त्याचे डोके धाडकन आपटते.

अंदाज चुकल्यामुळे तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झालीय. या स्टंटचा व्हिडिओ एक्स अॅपवरील @1000waystod1e या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. याआधीही आपण मोठ्या उंचीवरुन पाण्यात उडी मारण्याच्या नादात जीव गेल्याचे व्हिडिओ पाहिले आहेत. तरीही स्टंट करण्याचा मोह व्यक्तींना सुटत नाही.

एक्स अॅपवरील या व्हायरल व्हिडिओला हजारांच्या घरात लाईक्स मिळालेत, तर मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत आहेत. अन्य सोशल साईटवर व्हिडिओला नेटकऱ्यांकडून फॉरवर्ड केले जात आहे. नेटकऱ्यांनी असे स्टंट करताना आपली आणि आपल्या घरातील लहान मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT