Delhi Metro Viral Video Saam DIgital
व्हायरल न्यूज

Viral Video: टिंकू जिया....गाण्यावर तरुणाचा दिल्ली मेट्रोमध्ये विचित्र डान्स; VIDEOपाहून युजर्स म्हणाले...

Delhi Metro Viral Video: व्हिडिओमध्ये एक तरुण प्रवाशांसमोर विचित्र डान्स करत आहे. या डान्सला पाहून व्हिडिओ पाहणारा यूजर्स नक्कीच डोक्याला हात मारेल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Delhi Metro Dance Video

दिल्ली मेट्रो कायमच नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय असते. प्रत्येक चार-पाच दिवसांत एक ना एक अतरंगी व्हिडिओ दिल्ली मेट्रोमधून व्हायरल होतो. सध्या सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोतील आणखीन एक नवा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण प्रवाशांसमोर विचित्र डान्स करत आहे. या डान्सला पाहून व्हिडिओ पाहणारा यूजर्स नक्कीच डोक्याला हात मारेल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडियावर व्हायरल आणि फेमस होण्यासाठी सध्याच्या तरुण वर्गाला कसलेही भान राहिलेले नाही. प्रसिद्धी मिळवण्यासाठी फक्त मुलींच नाही तर मुले देखील विचित्र हरकती करत असतात. अशातच सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, एका तरुणाने विचित्र कपडे परिधान केलेले आहेत तसेच विचित्र चष्मा घातलाय. हे सर्व घातल्यानंतर तो टिंकू जिया या हिंदी गाण्यावर डान्स करत आहेत. त्याच्या आजूबाजूला इतर प्रवासी बसलेले आहेत. तरुणाचा विचित्र डान्स करताना पाहून सगळेच हसत आहेत. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की,'टॅग करा तुमच्या मित्राला जो असा डान्स करतो,मेट्रो मध्ये नया नमुना'

दिल्ली मेट्रोतील डान्सचा व्हिडिओ इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवरील delhi.connectionया पेजवर पोस्ट करण्यात आलाय तसेच व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्यात. एका यूजरने कमेंट करत लिहिले की,'मस्तच' तर तर 'परीक्षेसाठी प्रेरणा'अशी प्रतिक्रिया आणखी एका यूजरने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मालदिवपेक्षाही सुंदर! भारतातील 'हे' ठिकाण

UP Politics : 19 उपाध्यक्ष, 8 महामंत्री; निवडणुकीआधी राज्यातील भाजपमध्ये मोठा उलटफेर

Modi Cabinet Reshuffle: मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये IAS अधिकाऱ्याला मिळणार मंत्रिपद, कोण आहेत त्या महिला खासदार?

Maharashtra News Live Update: नाशिकमधील मक्याच्या शेडमध्ये आढळला विषारी कोब्रा

Krishi Thapanda: धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी आढळला ३३ वर्षीय मित्राचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

SCROLL FOR NEXT