Viral Video Twitter
व्हायरल न्यूज

Delhi Metro Viral Video: हातात गुलाब घेत तरुण गुडघ्यावर बसला, पण काही क्षणात मुलीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला, पाहा VIDEO

Latest News: एका मुलाने मुलालाच प्रपोज केल्याचा हा व्हिडिओ असून तो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Priya More

Delhi Viral News: दिल्ली मेट्रोतील (Delhi Metro) अनेक व्हिडिओ आतापर्यंत सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत. दिल्ली मेट्रोतून कधी माकड प्रवास करतंय, कधी कोणी अंघोळ करतंय, कधी कोणी गोधडी घेऊन झोपतंय, कधी तरुणी बिकिनीवर प्रवास करते, तर कधी कपल किस करतंय. दिल्ली मेट्रोतल्या या व्हिडिओंनी आतापर्यंत सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अशामध्ये दिल्ली मेट्रोतला आणखी एक व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका मुलाने मुलालाच प्रपोज केल्याचा हा व्हिडिओ असून तो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

@profesorsahab या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. दिल्ली मेट्रोमध्ये एक मुलगा हातामध्ये गुलाबाचे फुल घेऊन कोणाची तरी येण्याची वाट पाहत उभा आहे. मेट्रोमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. अशामध्ये दशरथ पुरी मेट्रो स्टेशन आल्यानंतर एक मुलगा मेट्रोच्या आत प्रवेश करतो. मेट्रोचा दरवाजा उघडताच हा मुलगा आत येतो. तेवढ्यात हातामध्ये गुलाबाचे फुल घेऊन उभा राहिलेला मुलगा गुडघ्यावर बसून दुसऱ्या तरुणाला गुलाबाचे फुल देतो आणि त्याची गळेभेट घेतो.

तरुण दुसऱ्या तरुणाला प्रपोज करतानाच्या या व्हिडिओला ‘तू ही यार मेरा’ हे गाणं लावण्यात आलं आहे. तरुणाचे हे कृत्य पाहून मेट्रोमधील सर्व उपस्थित प्रवासी हसू लागतात. तर त्याचवेळी मुलांच्या शेजारी उभ्या असलेल्या एका तरुणीची रिअॅक्शन पाहण्यासारखी आहे. मेट्रोमध्ये उपस्थित असलेल्या प्रवाशांनी हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला 76 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay raut: “फडणवीसांच्या चेहऱ्यावरील हसू खोटं, भाजपमध्ये थेट ओपन वॉर सुरू”; संजय राऊतांचा मोठा दावा

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

ऑपरेशन टायगरनंतर शिंदेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये बंडखोर गितेंचा विजय; पराभवानंतर दराडेंचा भाजपवर 'दगाफटक्याचा' आरोप

Crime : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा हाफ एन्काउंटर, पोलिसांनी दोन्ही पायांवर झाडल्या गोळ्या

Baba Bhide Bridge : पुण्यातील बाबा भिडे पूल ६ जुलैपर्यंत राहणार बंद, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT