viral video instagram
व्हायरल न्यूज

Viral Video: खुल्लम खुल्ला रोमान्स! धावत्या बाईकवर तरुणाने तरुणीला केलं किस - पाहा VIDEO

Ankush Dhavre

Couple Kissing On Bike Video: सोशल मीडियाची क्रेझ इतकी वाढली आहे की, फेमस होण्यासाठी लोकं कुठल्याही थराला जात आहेत. बाईक स्टंट, पाण्यात उड्या, कारच्या बोनेटवर बसून व्हिडिओ शूट, डोंगराच्या टोकावर जाऊन व्हिडिओ आणि बरंच काही. हे सर्व फक्त फेमस होण्यासाठी. या नादात अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत.

मात्र अजूनही हा क्रेझ काही कमी झालेला नाही. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात एक कपल बाईकवरून जात आहे. दरम्यान बाईकवरून जात असताना, तो आपल्या प्रेयसीला किस करताना दिसतोय.

इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ राजा इंस्टा ५४६४ या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा आणि एक मुलगी बाईकवरून जाताना दिसून येत आहेत. बाईक चालवताना दोघांनीही हेल्मेट घातलेलं नाहीये. मुलगा बाईक चालवत असतो तर मुलगी त्याच्या मागे बसली आहे. बाईक चालवताना अचानक मुलगा मुलीला किस करण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. तर ४ हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. तसेच नेटकरी या व्हिडिओ कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. या अकाऊंटवर त्याचे २ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

या व्हिडिओवर नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. एका युजरने लिहिले की, 'एक दिवस रील्स बनवण्याच्या नादात टक्कर देशील त्यानंतर स्वत:च्या फोटोवर फुलांची माळा चढवावी लागेल.' तर अनेक लोकं आहेत, ज्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT