viral video News viral video News
व्हायरल न्यूज

viral video : धावत्या बसमध्ये चालकाला हार्ट अटॅक, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

viral video News : कंडक्टरच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचा जीव वाचलाय. अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Namdeo Kumbhar, Vinod Patil

viral video Marathi News : धावत्या बसमध्ये चालकाला हार्ट अटॅक आल्यामुळे बसमधल्या प्रवाशांच्या हृदयाचा थरकाप उडाला...पाहणा-यांच्याही हृदयाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ व्हायरल झालाय. नेमकं बसमध्ये काय घडलं. आणि कंडक्टरनं सर्वांना कसं वाचवलं यावरचा विशेष रिपोर्ट.

मृत्यू कधी कसा आणि कुणाला येईल याचा नेम नाही. असाच एक व्हिडिओ सोशल मीडिया तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडिओ नीट निरखून पहा, ही बस भारधाव वेगात चाललीय. अचानकपणे बस चालकाला हार्ट अटॅक येतो. चालकाचं स्टेरिंगवरचं नियंत्रण सुटतं आणि तो खाली कोसळतो. मात्र त्याचवेळी कंडक्टरच्या ही बाब लक्षात येते, आणि कंडक्टर स्टेरिंगचा ताबा घेऊन बस थांबवतो..कंडक्टरच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळलाय मात्र या घटनेत बसचलकाचा मृत्यू झालाय. हा व्हिडिओ कर्नाटकातल्या बंगळुरूतला आहे. या घटनेनं हार्ट अटॅकचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. काही दिवसांपूर्वी एका पार्टीत डान्स करत असताना दिल्लीत एका पोलिसाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता.

मानसिक आणि शारीरिक ताण, बदलती जीवनशैली व्यसनाधीनता, जंक फूड, खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी

अशा अनेक कारणांमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो भारतात हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे ही तितकच गरजेच आहे.

त्यासाठी सकस आहार घ्या

दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा अशा व्यसनांपासून दूर राहा.

तणाव कमी करा.

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा.

वेळोवेळी आरोग्य तपासणी करा.

हार्ट अटॅक सारख्या गंभीर आजारांपासून दूर राहायचं असेल तर आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. तुमचं दुर्लक्ष तुमच्या जीवावरही बेतू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Maharashtra Election : नागपुरात घबाड सापडले, पोलिसांनी तब्बल दीड कोटी जप्त केले

Mhada Lottery: सर्वसामान्यांना दिलासा! म्हाडाच्या ६२९४ घरांच्या अर्जासाठी मुदतवाढ; १० डिसेंबरपर्यंत करु शकता अर्ज

Viral Video: बापरे! ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले अन् स्कूल व्हॅन उलटली; धडकी भरवणारा सीसीटीव्ही व्हायरल

Singham Again Vs Bhool Bhulaiyaa 3: 'रूह बाबा'नं केलं 'सिंघम'ला धोबीपछाड, 13व्या दिवशी किती कमाई?

SCROLL FOR NEXT