Blue Dosa Video Saam TV
व्हायरल न्यूज

Blue Dosa Video: खाते रहो! सोशल मीडियावर Viral झालाय निळा डोसा; VIDEO पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल...

Blue Dosa Viral Video: सध्या सोशल मीडियावर फार अनोखे आणि शक्यतो कुणी कधी खाल्ले नसतील असे पदार्थ व्हायरल होत आहेत.

Ruchika Jadhav

Viral Video:

खवय्ये नेहमीच नवनवीन पदार्थ चाखण्यासाठी लांब लांब शहरामध्येही भेट देतात. आपल्या जीभेजे चोचले पुरवण्यासाठी विविध पदार्थ चाखतात. सध्या सोशल मीडियावर फार अनोखे आणि शक्यतो कुणी कधी खाल्ले नसतील असे पदार्थ व्हायरल होत आहेत. आता सोशल मीडियावर एक निळ्या रंगाचा डोसा व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

आतापर्यंत तुम्ही साधा डोसा, प्लेन डोसा, मसाला डोसा, चीज डोसा असे विविध प्रकारचे डोसे खाल्ले असतील. मात्र तुम्ही निळ्या रंगाचा डोसा खाल्ला आहे का? निळ्या रंगाचा डोसा ज्या स्टॉलवर बनवला जातोय तेथील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. खवय्यांनी या व्हिडीओला मोठी पसंती दिली आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या व्यक्तीने डोसा बनवण्याचे जे बॅटर आहे ते निळ्या रंगाचे बनवले आहे. निळ्या रंगाचे बॅटर त्याने तव्यावर टाकले. त्यानंतर बाकीचे डोसे जसे बनवले जातात अगदी त्याच पद्धतीने तो डोसा बनवत आहे. सर्व मसाले, कांदा, मिरची आणि तेल टाकून या व्यक्तीने खमंग डोसा भाजून घेतलाय. हा डोसा पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल.

@khate_raho_dilse या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. रायपूर येथील हा डोसेवाला आहे. त्याने आपल्या रेसीपीमध्ये काहीतरी नाविन्य असावं म्हणून अशा पद्धतीने निळ्या रंगाचा डोसा बनवलाय. व्हिडीओवर त्याने निळा डोसा असं लिहिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार? बारामतीमधील बॅनरवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या भूम तालुक्यातील गावातल्या शेकडो शेतकऱ्याचं रास्ता रोको

Gold Rate: सोन्याचे दर ₹८५००० पर्यंत घसरणार? आता खरेदी करावं की नाही

Viral Video : वऱ्हाड निघालं रेल्वेनं! लग्नाचा थाट असा की थेट ट्रेनचा कोच बुक केला, डान्स-गाणी अन् बरंच काही....; VIDEO व्हायरल

International Film Festival: मराठी अभिनेत्याचा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये बोलबाला, 'द मशरूमस' साठी मिळवला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार

SCROLL FOR NEXT