Birthday Cake Fire Stick Blast Saam TV
व्हायरल न्यूज

Birthday Cake Fire Stick Blast: केकवर मेणबत्ती लावताच धाडकन स्फोट; किंकाळ्या आणि धावपळ, थरारक VIDEO व्हायरल

Accident In Birthday Viral Video: सोशल मीडियावर सध्या असाच एका दुर्दैवी घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी सुंदर नटून आलीये. तिचा वाढदिवस असल्याने ती येथे सगळ्यांत स्पेशल आहे.

Ruchika Jadhav

Birthday Party Viral Video:

वाढदिवस म्हटल्यावर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील वर्षातील एक मोठा आणि खास दिवस. प्रत्येक जण आपला वाढदिवस कुटुंबियांसह तसेच जवळच्या व्यक्तींसह साजरा करतात. ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्याला खास वाटावं म्हणून अन्य मित्रमंडळी जंगी सेलिब्रेशनची तयारी करतात. मात्र आपल्या वाढदिवसाच्याच दिवशी आपल्यासोबत एखादी मोठी दुर्घटना घडली तर. प्रत्येकासाठी हे वार वाईट आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडियावर सध्या असाच एका दुर्दैवी घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी सुंदर नटून आलीये. तिचा वाढदिवस असल्याने ती येथे सगळ्यांत स्पेशल आहे. केक कट करण्यासाठी ती समोर उभी राहते. तिच्या पुढ्यात टेबलवर केक ठेवला जातो. त्यावर एक फायर कॅन्डल असते. ही कॅन्डल तरुणी पेटवत असते.

मात्र कॅन्डल पेटल्यावर आपल्यासोबत काहीतरी विचित्र घडणार आहे. आपल्यावर काळ घाला घालणार आहे, अशी कोणतीही कल्पना तिला नसते. अगदी आनंदात ती फायर कॅन्डल पेटवते. तितक्यात मोठा स्फोट होतो आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं. सेलिब्रेशनसाठी जमलेले मित्रमैत्रिणी तेथून आपला जीव वाचवून धावपळ करू लागतात.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुणीने कॅन्डल पेटवल्यावर स्फोटचा मोठा आवाज होतो आणि आग लागते. आगीच्या ज्वाळा अगदी बाहेरपर्यंत फेकल्या जातता. एवढ्या भीषण घटनेत या तरुणीचं पुढे काय झालं. तिला दुखापत झाली की ती सुखरूप आहे. याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र व्हिडीओ पाहून सर्वांच्याच काळजात धडकी भरतेय.

@annoying_.girl._t या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. केक कापताना शक्यातो फायर कॅन्डल, मॅजिक कॅन्डल वापरू नका असं यावर कमेंट करत अनेक नेटकऱ्यांनी म्हटलंय. तसेच काहींनी यावर चिंता व्यक्त केलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Fort : शिवरायांच्या स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार, 'रायगड'बद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहितेय का?

Maharashtra News Live Update: मेळघाटातील भुमकाबाबा मंदिर अखेर दर्शनासाठी खुले

Gaurav More Wedding : 'फिल्टरपाड्याचा बच्चन' चढला बोहल्यावर; गौरव मोरेने गुपचूप बांधली लग्नगाठ, बायकोसोबतचा पहिला फोटो आला समोर

Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट; आणखी एक महिला अधिकारी रडारवर, प्रशासनात खळबळ

Jio Plan : जिओचा भन्नाट रिचार्ज प्लॅन, 329 रुपयांत होणार मोठा फायदा

SCROLL FOR NEXT