Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : ट्राफिक जाममधून वाट काढत दुचाकीस्वार दोन्ही बसच्या मधोमध अडकला; स्टंटबाजीचा VIDEO व्हायरल

Bike Stint Viral Video : एक दुचाकीस्वार दोन भल्या मोठ्या बसच्या मधोमध अडकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Ruchika Jadhav

प्रत्येकाच्या आयुष्यात सोशल मिडिया प्लॅटफॉर्म खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर सर्वानांच सोशल मिडियावर मोठ्या संख्येने फेमसही व्हायचं असतं. रिल बनवण्याच्या नादात लोकं वेगवेगळे स्टंट करताना पाहायला मिळतात. फेमस होण्यासाठी काही जण काय करतील आणि काय नाही हे सांगता येत नाही.

सोशल मिडियावर अनेक स्टंटबाजीचे व्हिडिओ पाहायला मिळतात. याच स्टंटमुळे लोक आपला जीवही गमावून बसतात. सोशल मीडिवर बाईक किंवा कार स्टंटचे व्हिडिओ देखील पाहायला मिळत आहेत. वाहनांसह सुरू असलेल्या जीवघेण्या स्टंटमुळे व्हिडिओमुळे रस्त्यावरील नागरिकांना ही फार मोठा धोका असतो.

असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर खूप व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक दुचाकीस्वार ट्राफिक जाम झालेल्या रस्त्यावरून वाट काढत चालला आहे. या तरुणाने थेट दोन बसमधून त्याची बाईक बाहेर काढली आहे. दुचाकीस्वाराचा हा प्रताप तेथे उपस्थित काही व्यक्तींनी त्यांच्या फोनमध्ये कैद केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लोकांच्या प्रतिक्रिया

या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर यूजर्सनीं खूप कमेंट्स केल्या आहेत. त्यांना हा व्हिडेओ आवडलेला नसून, त्यांनी सांगितले आहे की, नागरीक वाहतुकीच्या बाबतीत नियमांचं पालन करताना पाहायला मिळत नाही. यांमुळे एखाद्याला जीव ही गमवावा लागू शकतो. हा व्हायरल व्हिडिओ आपल्याला @DriveSmart-IN या अंकाउटवर पाहायला मिळेल. प्रत्येक वाहन चालकाने गाडी चालवताना खूप लक्ष ठेवले पाहिजे. अपघाताची शक्यता निर्मान होणार नाही. याची काळजी घेतली पाहीजे.

सध्या अपघाताच्या अनेक घटना घडत आहेत. वाहनांना कट मारून पुढे पळणे. वाहनांना धडक देणे अशा घटना घडत आहेत. आजवर वाहनांच्या अपघातात अनेक व्यक्तींचा जीव गेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने वाहन चालवताना या गोष्टींची काळजी घेत वाहतूकीचे नियम देखील पाळले पाहिजेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना भाजपाची उमेदवारी

Deool Band 2 Collection : IPL च्या धामधूमीतही 'देऊळ बंद 2' चा डंका; प्रवीण तरडेंच्या चित्रपटाची तुफान क्रेझ, कमाईचा आकडा कितीवर पोहचला?

Myanmar Blast : शक्तीशाली बॉम्बस्फोटात ५५ जणांचा मृत्यू, ७० हून अधिक जखमी; पाहा नेमकं काय घडलं?

प्रसिद्ध रिलस्टार झाली हिरोईन, स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार 'श्रद्धा पवार', कोण आहे ही अभिनेत्री? पाहा तिचे फोटो

Accident News : महाराष्ट्र एक्सप्रेसची भीषण धडक; महिलेसह 15 शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT