Saam Tv
व्हायरल न्यूज

सहलीचा आनंद जीवघेणा ठरला; धबधब्यावर भिजत असताना आला भलामोठा साप; पर्यटकांची उडाली धांदल

Snake in Kempty Falls: सोशल मीडियावर सध्या एक भयानक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही पर्यटनासाठी जाताना काळजी घ्याल. नक्की काय घडले आहे ते व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

पावसाळा म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याची अनुभूती घेण्याचा सर्वोत्तम काळ असतो. डोंगरदऱ्यांतून कोसळणारे नयनरम्य धबधबे आणि डोळ्यांना सुखावणारी हिरवाई, थंडगार हवामान आणि वाहत्या पाण्यात भिजण्याचा अनोखा अनुभव यामुळे हा ऋतू अधिकच खास वाटतो. विविध राज्यातील लोक त्यांच्या जवळील पर्यटन स्थळी जात असतात. मात्र, निसर्गाचा हा आनंद घ्यायला गेले असताना बऱ्याचदा तो धोकादायकही ठरु शकतो, हे परत एकदा दिसून आले आहे.

असाच एक थरारक प्रकार नुकताच समोर आला आहे. काही पर्यटक (Tourist) धबधब्याजवळील पाण्यात भिजण्याचा आनंद घेत असतानाच त्यांच्या समोर अचानक एक भलामोठा साप येतो. पाण्यात डुंबणाऱ्या लोकांना आधी काहीच कळाले नाही. मात्र एका व्यक्तीने सापाची हालचाल पाहिली आणि जोरजोरात आरडाओरड सुरू केली. काही क्षणांतच सर्वत्र गोंधळ उडाला.

सापाचे नाव ऐकताच पाण्यात मजा करणारे पर्यटक घाबरले आणि धावत बाहेर येऊ लागले. काहींनी धबधब्याजवळच्या दगडांवर चढून आपला जीव वाचवला. एका क्षणासाठी तिथे एकच घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. काहींनी मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करत असतानाच सापाचे दर्शन झाले, त्यामुळे हा थरारक प्रकार कॅमेऱ्यातही कैद झाला आहे.

सर्व प्रकार उत्तराखंड येथील केम्पटी फॉल असलेल्या पर्यटन स्थळातील आहे. सध्या हा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत असून तो सध्या इन्स्टाग्रामवरील news24official या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. हा प्रकार पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक हैराणजनक तर काहींनी मजेशीर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

SCROLL FOR NEXT