Viral Video Saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video : बाईईईई... हा काय प्रकार? तरुणाईला जडलाय निक्की तांबोळीचा फिव्हर, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल....

Nikki Tamboli Dialogue Dance Video Viral: महाराष्ट्रातील तरुणाईला निक्की तांबोळीचा फिव्हर जडला आहे. दहीहंडीमध्येही निक्की तांबोळीचा फिव्हर पाहायला मिळाला होता.

Vishal Gangurde

मुंबई : बिग बॉस मराठी कार्यक्रमात दिवसेंदिवस धम्माल दिसून येत आहे. या कार्यक्रमात पहिल्या दिवसापासूनच छत्रपती संभाजीनगरमधील निक्की तांबोळीने लक्ष वेधून घेतलं आहे. निक्कीच्या फटकळ स्वभावाला नेटकऱ्यांकडून नावं ठेवली जात आहेत. तर काही चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत. स्वभावाने फटकळ असलेल्या निक्कीच्या रोजच्या बोलण्यात 'बाई...' हा शब्द असतोच. तिच्या 'बाई' शब्द बोलण्यावरून नेटकरी ट्रोल करू लागले आहेत. नेटकरी इतके ट्रोल करू लागले आहेत की, जणू तिच्या 'बाई' शब्द बोलण्याचा फिव्हरच तरुणाईला जडला आहे. तरुणांच्या आवडत्या सणातही याची प्रचिती पाहायला मिळाली.

बिग बॉस मराठीच्या प्रत्येक भागानंतर नेटकऱ्यांमध्ये निक्की तांबोळीची चर्चा असते. काही दिवसांपूर्वी घन:श्याम दरवडे उर्फ छोटा पुढारी आणि निक्की तांबोळी यांच्यातील प्रेमळ संवादाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. बिग बॉस मराठीच्या घरातील दोघांचे संवाद व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं होतं. या संवादानंतर अनेकांनी सोशल मीडियावर दोघांना ट्रोल केले. नेटकऱ्यांच्या निशाण्यावर पहिला घन:श्याम दरवडे होता. त्यानंतर निक्की नेटकऱ्यांच्या निशाण्यावर होती.

दोघांचा प्रेमळ संवाद पाहून अनेकांना सैराटच्या रिंकू आणि परश्याची आठवण झाली. आता दोघांच्या संवादादरम्यानचा 'बाई' या शब्दाची जोरदार चर्चा होत आहे. निक्की तांबोळीच्या 'बाई' शब्दावर अनेकांनी मिम्स आणि कॉमेडी व्हिडिओ तयार केले आहेत. आता त्यात नवी भर पडली आहे. गाण्यातही निक्की शब्द ऐकायला मिळू लागला आहे. तिच्या 'बाई' शब्दावरही तरूणाई बेधुंद नाचताना दिसत आहे. याचा अंदाज तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून लावू शकता.

व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?

सोशल मीडियावर पुण्यातील दहीहंडीदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये तरुणाई डिजेच्या तालावार बेभान नाचत आहे. या गाण्यात बिग बॉस मराठी सदस्य निक्की तांबोळीचा आवाज मिक्स करण्यात आला आहे.

निक्की तांबोळीच्या आवाजातील 'बाई' शब्द गाणे सुरु असतानाच कानी ऐकू येते. हा व्हायरल झालेला व्हिडिओ पुण्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे. पुण्यातील दहीहंडीच्या दिवसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओ लाखो जणांनी पाहिला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ मित्रांना शेअर केला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

SCROLL FOR NEXT