Metro Train Dance Video Saam TV
व्हायरल न्यूज

Metro Train Dance Video: एकच नंबर! मेट्रो ट्रेनमध्ये तरुणीचा जबरदस्त डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Bhopal Metro Train Viral Video: व्हिडीओत एका तरुणीने 'किसी दिन ये तमाशा हम भी देखेंगे'या गाण्यावर जबरदस्त डान्स केलाय.

Ruchika Jadhav

Bhopal News:

दिल्ली मेट्रोमधील अनेक अतरंगी डान्स आणि स्टंटचे व्हिडीओ तुम्ही आजवर पाहिले असतील. मेट्रो ट्रेनमध्ये कोण कधी काय करेल आणि फेमस होईल याचा काही नेम नाही. अशात आता भोपाळ मेट्रो ट्रेनमधला एक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओत एका तरुणीने 'किसी दिन ये तमाशा हम भी देखेंगे' या गाण्यावर जबरदस्त डान्स केलाय. (Latest Viral Video)

आजकालच्या तरुण पिढीला जुन्या गाण्यांची, संगिताची आवड नसल्याचं पाहायला मिळतं. मात्र या तरुणीने जुन्या गाण्यावर मस्त डान्स केलाय. तिच्या डान्स स्टेप्स नेटकऱ्यांना फार आवडल्यात. सोशल मीडियावर या तरुणीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. @Vlogger Bhopali या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय.

सोशल मीडियावर आतापर्यंत दिल्ली आणि मुंबई मेट्रो ट्रेनमधील व्हिडीओ व्हायरल झालेत. मात्र आता भोपाळमधील तरुण तरुणी देखील सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी अशा पद्धतीने रील व्हिडीओ शूट करत आहेत. व्हिडीओ पोस्ट करताना त्यावर दिल्लीतला नाही तर भोपाळ मेट्रोमधील हा व्हिडीओ, असं लिहिलं आहे.

काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर मुंबई लोकल ट्रेनमधील व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये तरुणीने पोल डान्स केला होता. तिच्या पोल डान्समुळे नेटकरी पोट दुखेपर्यंत हासले.

दिल्ली मेट्रोत फक्त डान्स नाही तर काळजात धडकी भरवणारे स्टंट देखील पाहायला मिळाले आहेत. अनेक तरुण धावत्या ट्रेनमध्ये स्टंटबाजी करतात. तर काही तरुण प्रेमीयुगुल आपण कुठे आहेत याचं भान सोडून देतात. दिल्ली मेट्रोमध्ये एका प्रेमीयुगुलाचा कीससीनचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satin Silk Saree: महिलांसाठी सॅटिन सिल्क साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

Maharashtra News Live Update: दिवेआगर दुर्घटनेप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल, ८ विद्यार्थ्यांचा झाला होता मृत्यू

चिनाब पुलामुळे काश्मीरच्या विकासाला गती; रेल्वे संपर्कातून पर्यटन आणि व्यापाराला चालना

Ladki Bahin Yojana: नवरात्रीनंतर दसराही गेला, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० रुपये कधी जमा होणार? वाचा अपटेड

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल अन् CNG च्या दरात वाढ, तुमच्या शहरातील आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT