watermelon saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check: तुम्ही खाताय प्लास्टिकचं कलिंगड? कलिंगड हिरवं दिसण्यासाठी प्लास्टिकचं कोटिंग? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Are You Eating Plastic-Coated Watermelons? तुम्ही आवडीने कलिंगड खात असाल तर सावधान...तुम्ही खात असलेलं कलिंगड प्लास्टिकचं असू शकतं...बाजारात असे कलिंगड आल्याचा दावा करण्यात आलाय...त्यामुळे आम्ही याची पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

तुम्ही कलिंगड आवडीने खात असाल तर हे कलिंगड पाहा...कसं या कलिंगडला प्लास्टिकची कोटिंग करण्यात आलीय...कलिंगड बाहेरून हिरवं दिसावं म्हणून ही प्लास्टिकची कोटिंग करण्यात आलीय...कारण, कलिंगड हिरवं असल्यास अनेकजण असे कलिंगड विकत घेतात...सध्या उन्हाळा असल्याने थंड, रसाळ कलिंगड अनेकजण आवडीने खातात...मात्र, खऱंच असे कलिंगड विक्रीला बाजारात आलेयत का...?

उन्हाचा पारा इतका वाढलाय की दुपारी घरातून बाहेर पडायचं म्हटलं तरी नकोसं वाटतं...मात्र, याच उकाड्यात थंड, रसाळ आणि गोड कलिंगड खाण्याची मजा काही औरच असते...मात्र, तुम्ही खात असलेलं कलिंगड प्लास्टिकचं नाही ना...? कारण, एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यामध्ये प्लास्टिकचं कोटिंग असलेलं कलिंगड विक्रीला आल्याचा दावा करण्यात आलाय...यामुळे अनेकांची फसवणूक होऊ शकते...म्हणून आमच्या टीमने याची सत्यता जाणून घेतली...याबाबत अधिक माहिती एक्सपर्ट देऊ शकतात...आमची टीम एक्सपर्टला भेटली आणि त्यांना व्हायरल व्हिडिओ दाखवला...

कलिंगड विक्रीसाठी प्लास्टिक कोटिंग लावून विकले जातात

हिरव्यागार रंगाच्या कोटिंगमुळे अनेकजण कलिंगड खरेदी करतात

प्लास्टिक कोटिंगमुळे कलिंगड घेणाऱ्यांची फसवणूक होऊ शकते

कलिंगड घेताना कोटिंग लावलीय का तपासून पाहावी

प्लास्टिक कोटिंग असलेले कलिंगड खरेदी करू नका

कलिंगड तयार होतं तेव्हा त्याचा नैसर्गिक रंग असतो, मात्र कलिंगडला अनावश्यक कोटिंगची गरज नसते...कलिंगडवर हात मारल्यास पाण्याचा डब डब आवाज येतो...असं असल्यास रसाळ कलिंगड असल्याचं समजावं...मात्र, बाजारात प्लास्टिक कोटिंगवाली कलिंगड विक्रीसाठी आलेली आहेत...त्यामुळे कलिंगड घेताना तुम्ही काळजी घ्या...ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Maharashtra Rain Alert : दिवाळीवर पावसाचे सावट, पुढील काही दिवस राज्यात कोसळधारा, 'या' जिल्ह्यांना IMD नं दिला इशारा

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

Transferred : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ, सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी, तिघांचे निलंबन, नेमकं प्रकरण काय?

Bank Holidays: सोमवारी बँका बंद की सुरू राहणार? वाचा आठवडाभराच्या सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT