Cake Making Video Viral Saam TV
व्हायरल न्यूज

Cake Making Video Viral: बेकरीतला केक कसा बनवतात? VIDEO पाहून केक खाणं सोडून द्याल

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एका मोठ्या बेकरीमधील केक बनवण्याची प्रोसेस व्हायरल होत आहे.

Ruchika Jadhav

Bakery Cake Making Viral Video: प्रत्येक कार्यक्रमात शोभा आणि गोडीसाठी केक कापला जातो. गोड केक एकमेकांना भरवत सर्वजण आनंद व्यक्त करतात. सध्या सोशल मीडियावर एका मोठ्या बेकरीमधील केक बनवण्याची प्रोसेस व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील केक खाण्याआधी १० वेळा विचार कराल. (Latest Marathi News)

चविष्ट केक खाणं प्रत्येकाला आवडतं. बेकरीत (Bakery) देखील केकवर विविध रंगाची क्रीम लावून ते सजवले जातात. पाहता क्षणी प्रेमात पाडणाऱ्या या केकचा बेस महत्वाचा असतो. बेस केक मैद्याच्या पीठापासून बनवला जातो. केक सुंदर फुलण्यासाठी सोपी पद्धत म्हणजे त्यात अंड टाकलं जातं.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत केक बनवताना अस्वच्छपणा देखील स्पष्ट दिसतोय. यामध्ये एका व्यक्तीने अस्वच्छ बालदी घेतलीये. यात तो सर्व अंडी फोडून ठेवत आहे. ही अंडी फोडून झाल्यावर दुसऱ्या एकाने त्यात मैदा आणि तेल मिक्स करुन पीठ एकजीव करुन घेतलंय.

त्यानंतर आणखीन एक व्यक्ती हे सर्व बॅटर न्यूजपेपर लावलेल्या ट्रेमध्ये ओततो आणि सर्व बेक करुन घेतो. ही सर्व प्रोसेस सुरु असताना या व्यक्तीच्या हातात कोणत्याही प्रकारचे ग्लब्ज नसतात. शिवाय अंगावर फाटलेली बनीयान, लुंगी आणि पायजमा अशी खूप जास्त मळालेली कपडे आहेत.

गलिच्छ वातावरणात तयार होणारे हे केक सुंदर क्रिम लावून सजवले जातात. हे खाल्ल्याने अनेक आजार होण्याची शक्यता असते. चिराग नावाच्या एका व्यक्तीने आपल्या ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केलाय. सध्या हा व्हिडिओ (Video) जोरदार व्हायरल होत असून नेटकरी यावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soft Skin Tips: मऊ आणि मुलायम त्चचेसाठी रात्री चेहऱ्यावर काय लावावे?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची eKYCची मुदत वाढवली; मंत्री आदिती तटकरेंनी सांगितली २ कारणे

Pune Rain: पुण्याला सलग तिसऱ्या दिवशी पावसाने झोडपले, रस्त्यांना नदीचे स्वरूप; पाहा VIDEO

Celebrity Style Mangalsutra: सेलिब्रिटीस्टाईल शॉ्र्ट आणि युनिक मंगळसूत्र हवेत? हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

Ahilyanagar: तमाशा मंडळातील कलाकारांना बेदम मारहाण, महिलांनाही सोडलं नाही; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT