Viral Video  Saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video : दारू सोडवायला गेला अन् बाबाने चांगलाच कुटला; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

baba beaten drunk man : भोंदू बाबाने दारू सोडवायला आलेल्या तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Vishal Gangurde

योगेश गायकवाड, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : देशासहित राज्यातही तळीरामांची संख्या वाढत चालल्याचं दिसून येत आहे. अनेक संस्थांच्या आकडेवारीतून ही माहिती अनेकदा समोर आली आहे. शहर असो ग्रामीण या दोन्ही भागात तळीरामांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसते. घरातील एका व्यक्तीच्या दारुच्या व्यसनाचा त्रास पूर्ण कुटुंबाला होतो. त्यामुळे घरातील मंडळी या व्यक्तीला दारू सोडण्याविषयी सूचना करत असतात. अशाच प्रकारे एक तरुण भोंदू बाबाकडे दारू सोडवायला गेला. मात्र, या तरुणाला भोंदू बाबाने चांगलाच कुटला. बाबाकडून मारहाण होतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

तुम्ही राहत असलेल्या भागातही एकतरी व्यक्ती दारूच्या आहाराला गेलेला दिसतो. सकाळ झाल्यानंतर हा व्यक्ती दारुच्या दुकानावर दिसतो. दिवसभरातील काम सोडून हा व्यक्ती दारु प्यायचं काम करत असतो. अशा व्यक्तीच्या दारु पिण्याच्या व्यसनाला त्याच्या घरातील व्यक्तीही कंटाळलेले असतात. त्यामुळे घरातील सदस्यांकडून या व्यक्तीवर नानाविविध उपचार सुरु असतात.

काही लोक सतत दारु पिणाऱ्या व्यक्तीचं व्यसन सोडवण्यासाठी बाबा-बुवाचीही मदत घेतात. संकटात असलेल्या लोकांना हेरून बाबा-बुवा लुटमार करण्यास पटाईत असतात. अशाच प्रकारे एक तरुण एका भोंदू बाबाकडे गेला होता. मात्र, या बाबाने समुदपेशन करण्याऐवजी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बाबाजवळ बसलेले लोकही हादरले.

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

एक तरुण दारु सोडवण्यासाठी बाबाकडे येताना दिसत आहे. दारू सोडवण्यासाठी आलेला तरुण येताच बाबाने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. बाबाने या तरुणाला चांगलाच चोप दिला. दारु न पिण्याची तंबीही देत आहे. मात्र, तरुण मी दारु सोडणार नसल्याचे ठामपणे सांगत आहे. त्यानंतर चिडलेल्या बाबाने तरुणाच्या गालावर, पाठीवर फटके दिले. बाबा बेदम मारहाण करुन तरुणाला दारु सोडण्यास सांगत आहे.

बाबाचा हा व्हायरल होणारा व्हिडिओ उत्तर महाराष्ट्रातील असल्याचा बोललं जात आहे. तर या भोंदू बाबाच्या व्हायरल व्हिडिओनंतर मार खाऊन हा तरुण दारु सोडेल का, यावरून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT