Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: वडोदऱ्यात वादळाचा थैमान! रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षावर कोसळले होर्डिंग; ऑटोचालकाचा दुर्दैवी मृत्यू; VIDEO

Vadodara Shocking Accident: गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर जगभरातील धक्कादायक घडलेल्या घटना पाहण्यासाठी मिळत आहेत. सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओही तसाच काहीसा आहे.

Tanvi Pol

Hoarding Collapse Video: गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बऱ्याच ठिकाणी या पावसासोबत विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचीही नोंद झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे आणि फलक कोसळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच गुजरातमधील वडोदरा शहरात घडलेली एक दुर्दैवी घटना सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

नेमके घडले तरी काय?

गुजरातमधील वडोदरामध्ये वादळाच्या जोरदार वाऱ्यांमुळे एका रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षावर अचानक एक मोठे होर्डिंग कोसळले. या घटनेत रिक्षाचालक जागीच ठार झाला. सर्व धक्कादायक (Shocking Video) घटना जवळील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण हैराण झाले असून हळहळ व्यक्त करत आहेत.

सीसीटीव्हीत कैद झाली मृत्यूची घटना

व्हायरल(Viral News) होत असलेल्या सीसीटीव्ही व्हिडिओत तुम्हाला, परिसराती नागरिकांची वर्दळ दिसत आहे. सर्वत्र वादळाची परिस्थिती निर्माण झाली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळ आणि कागद उडत असतात. त्याच परिसरात एक रिक्षा चालक तुम्हाला दिसून येईल. पुढील काही क्षणात त्याच रिक्षावर भल मोठं होर्डिंग कोसळते आणि रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू होतो.

ही घटना सर्वत्र व्हायरल झाली असून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील gujaratihamasar या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक नागरिकांमध्ये होर्डिंग मालकाविषयी संताप पसरला असून पोलिसांनी योग्य कारवाई करावी,अशी मागणी करण्यात येत आहे.

टीप: या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism: महाबळेश्वरही विसराल! उकाड्यात पुण्याजवळ पिकनीकसाठी हे ऑप्शन ठरतील परफेक्ट

Mumbai Surat : प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई ते सुरत धावणार रॅपिड रेल्वे; जाणून घ्या सविस्तर माहिती

Nauvari Saree For Bride: लग्नात सप्तपदीला नेसा या सुंदर नव्या डिझाईनच्या नऊवारी साड्या, सर्वजण पाहतच राहतील

EPFO: आता ATMमधून काढा PF चे पैसे; १ एप्रिलपासून बदलणार EPFO सिस्टीम; फक्त ही एकच अट

‘तुतारीचा बादशहा’ हरपला; सोशल मीडियावर भावुक रीलमधून आठवणींना उजाळा

SCROLL FOR NEXT