Wedding Shocking Incident Saam Tv
व्हायरल न्यूज

Wedding Shocking Incident: लग्न थांबवलं अन् नवरीनं केली नवरदेवाच्या मित्राची चांगलीच धुलाई; पाहा नेमकं काय घडलं

Bride Beating The Groom Friend: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण हैरण झालेले आहे. नक्की काय घडले ते एकदा पाहा.

Tanvi Pol

Wedding Funny Video: लग्नाच्या सोहळ्यात नवरी-नवरदेवाच्या गळ्यात वरमाला घालण्याचा क्षण अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा असतो. मात्र, नवरदेवाच्या मित्राने हा प्रसंगात असं काही केलं त्यामुळे नवरीने नवरदेवाच्या मित्राची सर्वांसमोर चांगली धुलाई केली आहे. सध्या हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालेला आहे.

व्हिडिओ तुम्हाला एक लग्नातील (Wedding) दिसून येत आहे. लग्न असल्याने सर्वत्र पाहुण्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. काही वेळात स्टेजवर नवरा-नवरी येतात आणि एकमेंकाना हार घालण्यासाठी उभे राहतात, त्यानंतर नवरी नवऱ्याच्या गळ्यात हार घालणार असते तेवढ्यात नवरदेवाचा एक मित्र त्याला गमतीने पाठी सरकवतो. मात्र त्यानंतर नवरीला असं केल्याने भयंकर राग येतो आणि ती नवरदेवाच्या मित्राला सर्वांसमोरच खानाखाली मारते. घडलेला प्रकार पाहुण्यांच्या मोबाईलमध्ये कैद झालेला आहे.

लग्नातील हा व्हिडिओ(Video) नक्की कुठल्या शहरातील आहे ते अद्याप समजले नाही. पण सोशल मीडियावर या व्हिडिओने प्रचंड धुमाकूळ घातलेला असून nm18liveया अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. आतापर्यंत लाखोंचे लाईक्स आणि व्ह्यूज या व्हिडिओला मिळालेले आहेत आणि फेसबूक, ट्वीटर अशा अनेक माध्यमांवरही हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे.

लग्नातील हा प्रकार पाहिल्यानंतर नागरिकांध्ये मोठी चर्चा झाली आणि त्यावर आता अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. एका यूजरने म्हटलं की,''मित्राला काय गरज होती त्याला पाठी ओढायची'' तर दुसऱ्या यूजरने म्हटलं,''असंच पाहिजे राव'' तिसऱ्या यूजरने म्हटलं,''हित एक तर मिळणं झाल्या आणि तुझं काय चालू आहे'' अशा अनेक मजेशीर प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

Kharadi Name History: खराडी हे नाव कसं पडलं? वाचा पुण्यातील प्रसिद्ध शहाराचा जुना इतिहास

SCROLL FOR NEXT