Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अरे बापरे... महिलांमध्ये जागेवरुन जोरदार बाचाबाची, मेट्रोतील हाणामारीचा VIDEO व्हायरल

Fighting Video: दिल्ली मेट्रोत घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यात नक्की काय झाले ते पाहून प्रत्येकजण हैराण झालेला आहे. एवढेच नाही तर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केल्यात.

Tanvi Pol

Delhi Metro Viral Video: मुंबई लोकल असो वा कोणतेही प्रवासी वाहन बऱ्याच वेळेस प्रवाशांमध्ये वादविवाद होणे सामान्य गोष्ट आहे. मात्र अनेकदा हे वाद चक्क हाणामारीचे रुप धारण करतात, असाच काहीसा प्रसंग दिल्ली मेट्रोमध्ये घडला आहे, जिथे काही महिलांमध्ये जागेच्या जागेवरून जोरदार मेट्रोतच हाणामारी झालेली आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता सर्व महिला वर्ग दिसत आहे. काही वेळात मेट्रोमध्ये असलेल्या दोन महिलांमध्ये जागेच्या कारणांवरुन वाद सुरु होतात. पाहता पाहता हे वाद कधी हाणामारीत बदलताच हे तिथे बसलेल्या महिलांनीही कळत नाही. दोन महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ तिथे असलेल्या एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद करत सर्वत्र व्हायरल केलेला आहे.

सध्या हा व्हिडिओ ''ndtvindia'' या इन्स्टाग्राम सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत १४ तासांचा अवधी होताच नेटकऱ्यांनी व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक्स तर असंख्य व्ह्यूज मिळत आहेत. याआधीही सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोतील हाणामारीचे तर कपल्सचे अनेक व्हिडिओ पोस्ट झाले आहे. मात्र या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला आहे.

नेटकऱ्यांचे भन्नाट रिअ‍ॅक्शन

दिल्ली मेट्रोतील व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे,''दिल्ली मेट्रो में आपका स्वागत है'' तर दुसऱ्या एका यूदरने लिहिले आहे,''मन भरुन हाणामारी करुन घ्या'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,''अजून जोरात हाणामारी करा'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

हा व्हिडिओ कधीचा आहे हे कळू शकलेले नाही. तो आता व्हायरल होत आहे. या व्हिडिओची पडताळणी केलेली नाही.फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT