Animal Fashion Show  Saam Tv
व्हायरल न्यूज

Animal Fashion Show: वाघ आणि सिंहाने साडी नेसून केला रॅम्पवॉक, जगातील आगळावेगळा फॅशन शो पाहिलात का?

Animal Fashion Show Viral Video:प्राण्यांचा रॅम्पवॉक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Manasvi Choudhary

सोशल मीडियावर अनेक हटके व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक व्हिडीओ असे असतात की ज्याचा आपण कधी विचार देखील करू शकत नाही. असाच एक प्राण्यांचा रॅम्पवॉक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

प्राण्यांना तुम्ही जंगलात वावरतानाच सोशल मीडियावर पाहिलं असेल. मानववस्तीत प्राण्यांचा वावर हा आपल्याला घातक असतो. मात्र आता प्राण्याचा फॅशन शो घेण्यात आला आहे. ज्यामध्ये सिंह, वाघ, हत्ती, घोडा आणि मांजर या प्राण्यांचा समावेश आहे. हे प्राणी त्यांच्या हटके अंदाजात दिसत आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये, तुम्ही पाहू शकता की काही प्राणी दिसत आहेत. या प्राण्यांनी हटके स्टाईलमध्ये साडी नेसून रॅम्पवॉक केला आहे. या प्राण्यांना मराठमोळ्या अंदाजात पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. जंगलातील प्राणी ठुमकत, मुरडत चालताना दिसत आहेत. हे प्राणी खूपच गोंडस दिसतायेत.

सोशल मिडिया @_aiwood या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'अॅनिमल फॅशन शो' असं लिहलं आहे. प्राण्यांचा या फॅशन शोमध्ये जंगलाचा राजा सिंह, वाघ, हत्ती दिसत आहेत. ट्रेडिशनल लूकमध्ये या प्राण्यांनी फॅशनच्या दुनियेतील पऱ्यांप्रमाणेच साडी नेसून रॅम्पवॉक केला आहे.

यामध्ये सिंहाने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. तर वाघ लाल साडीत दिसतोय.हत्तीने डोक्यावर फेटा आणि केशरी साडी नेसून रॅम्पवॉक केला आहे. प्राण्यांनी त्याच्या आकाराप्रमाणेच हे कपडे परिधान केल्याचे दिसतय. सोशल मीडियावर या व्हिडीओला ५० हजारांपेक्षा जास्त लाईक्स आले आहेत. तर नेटकऱ्यांनी व प्राणीप्रेमींनी या हटके स्टाईलचे कौतुक देखील केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

SCROLL FOR NEXT