Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच महिलेसोबत क्रूरता; झाडाला बांधून अमानुष मारहाण

Andhra Pradesh Shocking Video: आंध्र प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिथे कर्जाच्या परतफेडीवरून एक महिलेल्या तिच्या लहान मुलांसमोर मारहाण करण्यात आली आहे. सध्या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Tanvi Pol

आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील कुप्पम या ठिकाणी एक धक्कादायक आणि लाजीरवाणा प्रकार समोर आलेला आहे. जिथे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या मतदारसंघात घडलेल्या या घटनेमुळे राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. एका पक्षाच्या एका कार्यकर्त्याने केवळ ८०,००० रुपयांच्या कर्जाच्या वादातून एका २५ वर्षीय महिलेला झाडाला बांधले आणि तिला मारहाण केली.

पीडित महिला शिरीषा वय २५ ही कुप्पममधील रहिवासी असून तिच्या पतीने काही काळापूर्वी तिला सोडून दिले आहे. ती सध्या आपल्या दोन मुलांचे संगोपन एकटी करत आहे. घरखर्च भागवण्यासाठी तिने स्थानिक स्तरावरून काही पैसे उधार घेतले होते. तिच्या परिस्थितीमुळे कर्ज फेडण्यात काहीसा उशीर झाला आणि याच कारणावरून तिला अमानुष वागणूक मिळाली.

सदर घटना सार्वजनिक ठिकाणी अनेक लोकांच्या समोर घडली. संबंधित कार्यकर्त्याने शिरीषाला झाडाला बांधून ठेवले आणि तिचा अपमान केला. या प्रकाराचा व्हिडिओ स्थानिक नागरिकांनी रेकॉर्ड केला आणि तो सोशल मिडियावर तुफान व्हायरल (Viral) झाला. व्हिडिओमध्ये पीडित महिला मदतीसाठी ओरडताना दिसून येते, तर आजूबाजूचे काही लोक मात्र बघ्यांची भूमिका घेत असल्याचे दिसते.

ही घटना समजताच स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला. शिरीषा ज्या आर्थिक अडचणीतून जात आहे, त्यासाठी मदत करण्याऐवजी तिला समाजात अपमानित करणे हे अमानवीय आहे, असे स्थानिकांनी म्हटले. काही समाजसेवी संस्था आणि महिला संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपीला त्वरित अटक करण्याची मागणी केली.

सध्या हा व्हिडिओ(Video) सोशल माध्यमांवरील @KP_Aashish या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्येही घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती लिहिण्यात आली आहे. देशभरातून या घटनेला पाहिल्यानंतर विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत. ज्या प्रत्येक प्रतिक्रियेत या घटनेचा संताप व्यक्त करण्यात आलेला आहे.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Symptoms : मधुमेह म्हणजे काय? सुरुवातीची ही लक्षणे वाचाच

रणवीर सिंग किती शिकला आहे ते माहिती आहे का ?

Maharashtra Live News Update : मी नेहमी मीरा रोडमधील लोकांच्या बाजूने - प्रताप सरनाईक

Aadhar Card: लहान मुलाचं आधार कार्ड काढायचंय? ५ सोप्या स्टेप्स, घरीच मिनीटात होईल काम

Metro Yellow Line : खुशखबर! मेट्रोची पिवळी मार्गिका सज्ज, कधीपासून सुरु होणार? महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT