Viral Video saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बापरे! IShowSpeed ने'हँड ऑफ गॉड' वर केला धोकादायक स्टंट, पाहा व्हायरल VIDEO

Viral Video On Guatemala: लोकप्रिय अमेरिकन यूट्यूबर आणि स्ट्रीमर IShowSpeed त्याच्या आनंदी व्हिडिओ, लाइव्ह स्ट्रीम आणि धाडसी स्टंटसाठी ओळखला जातो.

Dhanshri Shintre

YouTube चा प्रसिद्ध 'IShowSpeed' ने अलीकडेच एक धाडसी पाऊल उचलला, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला. ग्वाटेमालामध्ये असलेल्या प्रसिद्ध 'हँड ऑफ गॉड' संरचनेवर त्याने बॅकफ्लिप केला, ज्यामुळे त्याचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्याच्या या कृत्यामुळे अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.

'हँड ऑफ गॉड' ही एक धोकादायक संरचना आहे, जी साहसप्रेमींमध्ये खूप लोकप्रिय आहे. उंची आणि अनोख्या डिझाइनमुळे ती पर्यटकांसाठी आकर्षण ठरली आहे. तथापि, या रचनेवर कोणत्याही प्रकारचे स्टंट करणे अत्यंत धोकादायक आहे. पण YouTube स्टार IShowSpeed ने या धोक्याची पर्वाह न करता बॅकफ्लिप करून त्याच्या फॉलोअर्सना आश्चर्यचकित केले. त्याच्या या कृत्यामुळे अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे, कारण ते त्याच्या जीवनासाठी धोकादायक ठरू शकते.

IShowSpeed ने त्याच्या YouTube चॅनेलवर थेट प्रक्षिप्त केलेल्या एका व्हिडिओमध्ये ग्वाटेमालामधील 'हँड ऑफ गॉड' संरचनेवर बॅकफ्लिप केला. उडी मारल्यावर तो सुखरूप उतरला, पण या धाडसी आणि जोखमीच्या कृत्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चिंता आणि चर्चेचा विषय बनला. या स्टंटमुळे त्याच्या निर्णयावर अनेकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

IShowSpeed च्या धाडसी बॅकफ्लिपवर सोशल मीडियावर मिश्रित प्रतिक्रिया उमठल्या आहेत. काहींनी त्याच्या साहसाचे कौतुक केले, तर दुसऱ्यांनी त्याला बेजबाबदार ठरवले. अनेकांनी त्याला सेल्फ प्रमोशनचा धोकादायक पाऊल म्हणत टीका केली. अशा स्टंटमुळे केवळ वैयक्तिक सुरक्षा धोक्यात येत नाही, तर ते इतरांना देखील अशा धोकादायक गोष्टी करण्यासाठी प्रेरित करू शकतात. हा व्हिडीओ सोशल मिडियावर 'Ghar ka kalesh' या ट्विटर अकांउटवर शेअर करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT