Viral Video saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अप्रतिम! एकीने गायले गाणे, तर दुसरीचा बिटबॉक्सचा कमाल ताल , पाहा व्हायरल VIDEO

Viral Video On Lavani And Beatbox: सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये दोन मुली गाणे गात आहेत. त्यांच्या गायनाने नेटकऱ्यांचे मन जिंकले असून, ते खूप खूश झाले आहेत.

Dhanshri Shintre

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज काहीतरी व्हायरल होत असते. तुम्ही कोणत्याही सोशल मीडियावर सक्रिय असाल तर तुम्ही नक्कीच व्हायरल व्हिडिओ पाहिला असेल. साधारणतः डान्स, भांडण आणि गायन हे व्हिडिओ सोशल मीडियावर लोकप्रिय होतात. काही व्हिडिओमध्ये मुले नाचताना आणि गाणी गाताना दिसतात. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये दोन मुली गाणे गात आहेत. त्यांच्या गायनाने नेटकऱ्यांचे मन जिंकले असून, ते खूप खूश झाले आहेत. या गाण्याच्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेला ऊत आला आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दोन मुली एक स्टेजवर गाणे गात आहेत. व्हिडिओ पाहताना असे वाटते की दोघी मैत्रिणी आहेत. काही वेळात एक मुलगी माईक घेऊन 'चंद्रा' हे गाणं गाण्यास सुरुवात करते, तर दुसरी मुलगी गाण्यावर अप्रतिम बिटबॉक्स करत आहे. तिचा आवाज आणि बिटबॉक्सची शैली अतिशय सुरेख आहे. दोघींच्या या अनोख्या सादरीकरणामुळे उपस्थित मंडळी मंत्रमुग्ध होतात. या व्हिडिओने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे, आणि नेटकरी त्यांचे कौतुक करत आहेत.

दोन मुलींचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे, मात्र तो व्हिडिओ "harshaliii_k आणि तिच्यासोबत _whopranjal_" या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. एक दिवसापूर्वी व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून काही काळातच लाखोच्या संख्येने नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी व्हिडिओला लाईक्सही केलेले आहे.

व्हिडिओ व्हायरल होताच प्रत्येक नेटकऱ्यांच्या पसंतीस आलेला असून बऱ्याच नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की, "किती सुंदर" तर अजून एका यूजरने लिहिले आहे की, "गायन आणि सर्वोत्कृष्ट जोडी" शिवाय अन्य यूजर्सनीही मुलींचे कौतुक केलेले आहे. या व्हायरल व्हिडीओला अजूनही अनेक लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT