Navratri Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Navratri Viral Video: भावांनो उत्सव देवीचा आहे, सगळ्या महिलांमध्ये देवीच बघा...; नवरात्रीत चिमुकलीच्या पोस्टरने टोचले भामट्यांचे कान, पाहा VIDEO

Social Message In Navratri By Baby Girl: नऊवारी साडीतल्या चिमुकलीला पाहण्यासाठी गरबा खेळण्यासाठी आलेल्या सर्वांच्या माना तिच्याच दिशेने वळल्या.

Ruchika Jadhav

Viral Video:

राज्यात सध्या नवरात्री उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. भाविक या दिवसांत देवीची मनोभावे सेवा करतात. तरुण मुलं मुली नटून -थटून गरबा आणि दांडियाचा आनंद घेतात. अशात सोशल मीडियावर एका चिमुकलीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झालाय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गरबा असो किंवा अन्य काही टवाळ मुलं मुलींची छेड काढतात किंवा काही कमेंट पास करतात. असे विचार असलेल्या मुलांसाठी या चिमुकल्या मुलीने घरून एक पाटीच लिहून आणलीये. यावर असं वागणाऱ्या तरुणांना चांगलाच चापकर देण्यात आलाय. तरुणांची कान टोचण्यात आलेत.

चिमुकल्या मुलीने देवीचा उत्सव कोणतेही गालबोट न लागता साजरा व्हावा यासाठी तरुणांचे कान टोचले. एका तरुणाच्या खांद्यावर ती बसली आहे. यावेळी तिच्या हातात असलेल्या पाटीवर तिने लिहिले आहे की, " भावांनो उत्सव देवीचा आहे, सर्व मुलींमध्ये देवीच बघा..." असं तिने यावर लिहिलं.

लहान मुलीचा हा मॅसेज पाहून अनेकांचे डोळे उघडलेत. नऊवारी साडीतल्या चिमुकलीला पाहण्यासाठी गरबा खेळण्यासाठी आलेल्या सर्वांच्या माना तिच्याच दिशेने वळल्यात. @aksahy.ak._ या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी चिमुकलीचं भरपूर कौतुक केलं आहे. तसेच असे सामाजिक संदेश नवरात्र उत्सवात देणे फार गरजेचे आहे, असंही काही नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये लिहिलं आहे. चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. प्रत्येक मुलाने असा विचार केल्यास प्रत्येक तरुणीला सुरक्षित वाटेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

औषधाच्या पाकिटावर असलेल्या लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ माहिती आहे का ? जाणून घ्या त्याचे महत्त्व

मुंबई इंडियन्सच्या संघात होणार मोठा बदल; कोण बनणार MIचा पुढचा कर्णधार? 'या' खेळाडूंच्या नावाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT