Ghibli Image Swami Samarth became Sai Baba Saam Tv News
व्हायरल न्यूज

Ghibli Image Generator : चुलीत गेलं ते गिबली-जिबली; स्वामी समर्थांना केलं साईबाबा, 'तो' VIDEO व्हायरल

Ghibli Image Generator : एवढं सगळं झाल्यानंतर कळस म्हणजे एआय टुलला अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि साईबाबांमध्ये फरक ओळखता आला नाही. एका युजरने स्वामी समर्थांच्या प्रकटदिनी त्यांच्या फोटोसोबत एक फोटो काढला होता.

Prashant Patil

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गिबली इमेजेसने चांगलंच क्रेझ सुरु झालं आहे. गिबली इमेज हे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) असलेलं तंत्रज्ञान आहे. या माध्यमातून चॅटजीपीटीवर तुम्हाला स्वत:च्या ॲनिमेटेड फोटो तयार करता येतात. आतापर्यंत कोट्यावधी युजर्संनी गिबली फोटोजचा वापर करुन आपल्या फोटो तयार केले आहेत. भारतासह जगभरातून याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने ओपन एआयचे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स असलेले हे टूल बंद पडले होते. गिबली इमेज तयार करुन घेण्यासाठी एकाचवेळी लाखो युजर्स चॅट जीपीटीचा वापर करत असल्याने ओपन एआयच्या सर्व्हरवर प्रचंड दबाव पडत आहे. त्यामुळे गिबली इमेज तयार करताना अनेक चुका होत असल्याचंही समोर आलं आहे.

यापैकी काही फोटो सध्या सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे. यापैकी एका फोटोत एका महिलेने तिचा नवरा आणि दोन लहान मुलींसह गिबलीवर फोटो अपलोड केला होता. मात्र, त्याची ॲनिमेटेड फोटो तयार होताना फोटोत नवऱ्याऐवजी दुसराच लहान मुलगा दिसत आहे. दुसऱ्या एका फोटोत एका जोडप्याने गुढीपाडव्याचा फोटो टाकला आहे. गुढीसह नवरा-बायकोचा फोटो अपलोड करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष गिबली इमेज तयार होताना त्याठिकाणी गुढीच्या ऐवजी एक पाठीमागे बाई दिसत आहे.

एवढं सगळं झाल्यानंतर कळस म्हणजे एआय टूलला अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि साईबाबांमध्ये फरक ओळखता आला नाही. एका युजरने स्वामी समर्थांच्या प्रकटदिनी त्यांच्या फोटोसोबत एक फोटो काढला होता. या फोटोची गिबली इमेज तयार करण्यासाठी युजरने हा फोटो चॅटजीपीटीवर अपलोड केला. मात्र, प्रत्यक्षात इमेज तयार होऊन आली तेव्हा डोक्यावर हात मारुन घेण्याची वेळ आली. कारण, या इमेजमध्ये स्वामी समर्थांऐवजी साईबाबा दिसत होते. दरम्यान, या फोटोवर अनेक युजर्सच्या कमेंट देखील आल्या आहेत. एकजण म्हणतोय की, स्वामी समर्थ आणि साईबाबा एकच आहे, एक म्हणतोय स्वामी समर्थ आणि साईबाबा एकच आहे हे गिबलीला समजलं पण आपल्याला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Walking: दररोज फक्त इतकंच चाला, राहाल फिट अँड फाइन; ढिगभर फायदे आणि आयुष्यही वाढेल

Konkan Food : कोकणात बनवतात तशी चमचमीत 'वालाची आमटी', गरमागरम भाताची चव वाढवेल

CM फडणवीसांच्या सभेआधी गोळीबार, भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर ४ राऊंड फायर, CCTV व्हिडिओ व्हायरल

Grahan Dosh: 2026 नव्या वर्षात या राशींवर कोसळणार दुःखाचा डोंगर; सूर्य-राहूचा अशुभ ग्रहण योग ठरणार धोकादायक

Dharmendra - Sunny Deol: 'बॉर्डर २'च्या टीझर लाँच दरम्यान सनी देओलचं डोळे पाणावले, नेमकं झाल काय? VIDEO

SCROLL FOR NEXT