Ahmedabad Saam Tv
व्हायरल न्यूज

Ahmedabad: पकडाल तर उडी मारेन... इमारतीवर उभं राहून शूटर AK-47 ची पोलिसांना धमकी, अटकेचा थरारक VIDEO

Shooter AK-47 arrest Video: सोशल मीडियावर सध्या एक हैराणजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या एक आरोपी पोलिसांपासून वाचण्यासाठी इमारतीच्या पाचव्या मजल्यावर चढला आहे. पण पुढे जे होते ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

Tanvi Pol

Ahmedabad Video: गुजरातमधून एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे. जिथे गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक वॉन्टेड गुन्हेगाराने इमारतीच्यावर चढून उडी मारण्याची धमकी पोलिसांना दिली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.

अहमदाबाद पोलिसांनी सोशल मीडियावर 'शूटर एके ४७' म्हणून शेखी मिरवणाऱ्या गुन्हेगार अभिषेक तोमर याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी प्रयत्न केल्यावर तो घाबरला आणि इमारतीवरून उडी मारण्याची धमकी दिली. परंतू,पोलिसांनी अगदी शिताफीनं त्याला अटक करून परिस्थिती नियंत्रित केली. त्याचा अटकेचा व्हिडीओही(Video) समोर आला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक परिसरातील इमारत दिसत आहे आणि इमारतीच्या संपूर्ण परिसरात असंख्य पोलिस दिसून येत आहे. जर तुम्ही व्हिडिओत नीट पाहिले तर इमारतीच्या पाचव्या मजल्याच्या बाहेर तो आरोपी पोलिसांपासून वाचण्यासाठी लपलेला असतो. तेवढ्यात पोलिस येतात आणि तो उडी मारण्याची धमकी त्यांना देत आहेत. पण पोलिसही त्याला कसे पकडता येईल ते पाहत आहे. व्हिडिओच्या शेवटी पाहिले तर पोलिस आरोपीला पकडण्यात यशस्वी होतात.

सध्या गुजरातमधील हा व्हिडिओ प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालेला आहे आणि तो जास्त संख्येने इन्स्टाग्रामवरील( Instagram) saamtvnews या अकाउंटवर पाहिला गेला आहे. त्यानंतर काय देशभरातील नेटकरी वर्गातून त्यावर विविध प्रतिक्रियाही आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT