Viral News Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral News: शालू झोका दे ग मैना...; अमेरिकेतही प्रभाकर मोरेंचा हटके डान्स, व्हिडिओ पाहून अभिमान वाटेल

Viral Video News: सोशल मीडियावर सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रामधील एका कलाकाराचा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. ज्यात नक्की काय घडचे ते तुम्ही पाहा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Prabhakar More Dance Video: सध्या सर्व प्रेक्षकांच्या आवडीचा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा. लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाजण आवडीने हा कार्यक्रम पाहत असतो. या कार्यक्रमामधील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या घराघरात पोहचले आहेत. सोशल मीडियावर या या कलाकारांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात,सध्या असाच एका कलाकाराच डान्स व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्या व्हिडिओने धुमाकूळ घातलेला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओ हा अमेरिकेतील आहे. जिथे गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राची हस्य जत्राची टीम दाखल झालेली आहे. मात्र व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, अमेरिकेतील एक परिसर दिसून येत आहे. काही वेळात व्हिडिओ महाराष्ट्राची हस्य जत्रामधील प्रभाकर मोरे आणि चेतना भट आहेत. मग काय प्रभाक मोरे एकदमच ''शालू झोका दे ग मैना'' हे गाणं म्हटण्यास सुरुवात करत डान्स (Dance)करतात. त्यांना यामध्ये चेतना भट तसेच नर्मता संभेराव आणि रसिका वेंगुर्लेकर तिघी साथ देतात. मग काय एका तालात चौघही धम्माकेदार डान्स करतात. सर्व व्हिडिओ तेथिल एका व्यक्तीने कॅमेऱ्याक कैद केलेला आहे.

प्रभाकर मोरे यांचा डान्स व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. मात्र खुद्द प्रभाकर मोरे यांनी त्यांच्या '@its_prabhakarmore' या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. व्हिडिओ दोन दिवसांपू्र्वीच शेअर होताच तब्बल १७ हजार नेटकऱ्यांनी व्हिडिओला लाईक्स केलेले आहेत तर मोठ्या संख्येने व्हिडिओला व्ह्यूज मिळत आहेत. एवढेच नाही तर अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने म्हटले आहे की,' एकदम कडक' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,' लेय भारी' तर इतरांनीही कौतुकास्पद प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

Maharashtra Live News Update: कोल्हापूरात शालेय पोषण आहार योजना घोटाळ्यावरुन कृती समिती आक्रमक

Men Perosnality: महिलांना कसे पुरुष आवडतात?

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

SCROLL FOR NEXT