Dance Video Saam TV
व्हायरल न्यूज

Dance Video: खान्देशी संबळवर आजीबाईंचा धडाकेबाज डान्स; जबरदस्त व्हिडीओ पाहाल तर पाहतच राहाल

Aaji Dance Video: अशात वाजंत्री अचानक संबळ बजावू लागतात. संबळ ऐकून एक आजीबाई तेथे येतात आणि त्यांना नाचण्याचा मोह आवरत नाही. त्या बिनधास्त आपला आनंद व्यक्त करत नाचू लागतात.

Ruchika Jadhav

Viral Video:

लग्न समारंभ म्हणजे डान्स, मजा-मस्ती. लग्नामध्ये प्रत्येक व्यक्ती आनंद व्यक्त करत डान्स करतात. यामध्ये काही व्यक्ती तर इतके अतरंगी पद्धतीने नाचतात की त्यांचा डान्स पाहून सगळ्यांचे लक्ष त्यांच्याकडे वेधते. अशात सोशल मीडियावर एका आजिबईंचा भन्नाट डान्स व्हिडिओ व्हायरल होतोय.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका ठिकाणी सुंदर लग्न समारंभ सुरू आहे. तरुण तरुणींसह लहान मुलांनी देखील गाण्यावर जोरदार ठेका धरला आहे. अशात वाजंत्री अचानक संबळ बजावू लागतात. संबळ ऐकून एक आजीबाई तेथे येतात आणि त्यांना नाचण्याचा मोह आवरत नाही. त्या बिनधास्त आपला आनंद व्यक्त करत नाचू लागतात. संबळवर नाचताना या आजींनी खान्देशी डान्स केला आहे.

आजींचा जोश पाहून तिथे उपस्थित अन्य व्यक्ती देखील मस्त डान्स करू लागतात. काष्टी साडी, डोक्यावर पदर आणि डोळ्यांना चष्मा अशा लूकमध्ये आजींनी हा डान्स केला आहे. @sambhal_king_sidhu या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे.

सोशल मीडिया हे एक असं मध्यम आहे जिथे एका रात्रीत व्यक्ती भरपूर फेमस होतात, व्हायरल होतात किंवा मग ट्रोल होतात. यातील काही व्हिडिओ इतके सुंदर असतात की ते पाहून मनाला समाधान शांती आणि आनंद मिळतो. तर काही व्हिडिओ असेही असतात जे पाहून हसून हसून गाल दुखू लागतात.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी देखील कमेंट्सचा आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. आजीबाईंना पाहून तेथे तरुणी आणि काही महिला देखील त्यांच्या भोवती घोळका करून नाचू लागतात. आता यातला कोणाचा डान्स तुम्हाला सर्वात जास्त आवडला असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. अनेकांनी कमेंटमध्ये आजीबाई असं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT