Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: पाण्यासाठी फायटिंग! हंडा, कळशी घेऊन महिलांची तुफान मारामारी, VIDEO

Viral Video News: सोशल मीडियावर सध्या काही महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात नक्की त्यांचे वाद कशावरुन सुरु झाले ते पाहूयात.

Tanvi Pol

Fighting Viral Video: गेल्या काही वर्षात घरोघरी पाण्याचे नळ आले. मात्र काही वर्षाआधी पाणी भरण्यासाठी महिलांना घराबाहेर असलेल्या सार्वजनिक नळावर पाणी भरण्यास जावे लागत असे. मग एकत्र जमल्यास बऱ्याचदा महिलांमध्ये वादविवाद होत असे. सध्या सोशल मीडियावर जुन्या काळातील आठवण ताजी करणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात पाणी भरण्यासाठी आलेल्या काही महिलांमध्ये जोरदार हाणामारी झालेली आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ काही महिला घराबाहेर असलेल्या नळाभोवती जमलेल्या आहेत. व्हिडिओ पाहून समजेल की या सर्व महिला पाणी भरण्यासाठी तिथे एकत्र जमलेल्या आहेत. मात्र काही वेळात या सर्व महिलामधील निळ्या रंगाची आणि हलकासा लाल रंगाची साडी नेसलेल्या महिलांमध्ये जोरदार हाणामारी होण्यास सुरुवात होते. महिलांचा वाद इतका टोकाला जातो की चक्क या महिला जमिनीवर ठेवलेले पाण्याचे हंडे उचलून एकमेंकीना मारण्यास(Fighting) सुरुवात करतात. त्यांच्या बाजूला असलेल्या इतर महिला त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात मात्र त्या तरीही कोणाच ऐकत नाही.

महिल्यांच्या हाणामारीचा हा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ''@gharkekalesh'' या अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हायरल व्हिडिओ कुठल्या गावातील आहे हे समजू शकलेले नाही मात्र व्हिडिओला नेटकरी वर्गातून प्रचंड पसंती मिळाली आहे. एवढेच नाही तर व्हिडिओला दिवसेंदिवस लाखोच्या घरात व्ह्यूज मिळत आहे शिवाय अनेक प्रतिक्रियाही मिळाल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''महिलांचे हे कायमचे आहे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' काय कराव यांच'' तर अनेक यूजर्संनी हाणामारीचे कारण विचारले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wildcat: मांजर कोणत्या बाजूने आडवी गेली तर काय करावं?

Kitchen Hacks: पीठ मळून फ्रिजमध्ये रात्रभर ठेवल्याने शरीराला त्रास होतो का? जाणून घ्या सत्य

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या रोखणार, सरकारचं मोठं पाऊल, टास्क फोर्स नेमकं काय करणार?

Maharashtra Live News Update : राज्यात आज शिवजंयतीचा उत्साह

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

SCROLL FOR NEXT