Delhi Metro urination video saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मेट्रो स्टेशनवर तरूणाचा किळसवाणा प्रकार, गेटजवळच केली लघवी, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Delhi Metro urination video: दिल्ली मेट्रो स्टेशनवर एका व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी लघवी केली. ही घटना प्रवाशांनी मोबाईलवर टिपली आणि सोशल मीडियावर शेअर केली.

Surabhi Jayashree Jagdish

दिल्लीच्या मेट्रोमध्ये घडणाऱ्या विचित्र घटना या काही नवीन नाहीत. कधी कपलचा व्हिडीओ तर कधी भांडणं अशा अनेक गोष्टींचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असंच दिल्ली मेट्रो स्टेशनवरचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही डोक्यात विचार येईल की, एक नागरिक म्हणून आपण देशाला कसं पुढे नेतोय.

हा व्हिडीओ तुम्हाला अत्यंत घाणेरडा वाटू शकतो. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मेट्रो स्टेशनवर खुलेपणाने लघवी करताना दिसतोय. कोणतंही पब्लिक टॉयलेट नाही तर कोणताही आडोसा नाही...हा व्यक्ती मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर अगदी उघड्यावर लघवी करताना कॅमेरात कैद झाला आहे.

लघवी करताना व्यक्ती कॅमेरात कैद

यावेळी तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीने त्याचा व्हिडीओ बनवून तो इंटरनेटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओ पाहून स्थानिक लोकं संतापले असून स्वच्छतेच्या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित करतायत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या व्यक्तीला हे कृत्य करताना कोणत्याही प्रकारची लाजही वाटली नाही. त्याच्यासाठी ही अगदी एक सामान्य बाब वाटत होती.

DMRC चं लोकांना अपील

या व्हिडीओवर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) ने प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये प्रवाशाांना स्वच्छतेवर लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मेट्रो प्रशासनाने म्हटलंय की, डीएमआरसी त्यांच्या सर्व प्रवाशांना परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करण्याची विनंती करतं. जर प्रवाशांना एखाद्या सहप्रवाशाने अशी कोणतीही कृती केल्याचं लक्षात आले तर त्यांनी ते त्वरित डीएमआरसी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही घटना आणून द्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : तुमच्या संपत्तीत वाढ होणार, दिवस चांगला जणार; ५ राशींच्या लोकांसाठी बुधवार गेमचेंजर ठरणार

Maharashtra Live News Update: शिंदेसेना भाजपमध्ये विलीन होईल; असीम सरोदे यांचा दावा

Crime News: मध्यरात्र, बंद खोली आणि पतीचं वेगळंच कृत्य...; संतप्त पत्नीने पतीची जीभच कापली, नेमकं काय घडलं?

साहेब, युती तोडा! भाजप कार्यकर्त्यांचा भररस्त्यात राडा ; ZPचा फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा

ऐन ZP निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मोठा हादरा; माजी मंत्र्याच्या मुलाची भाजपमध्ये एन्ट्री

SCROLL FOR NEXT