Gautami Patil Video Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात चिमुकल्याची हवा.. डान्स पाहून प्रेक्षकही थक्क; VIDEO व्हायरल

Gautami Patil Video: सध्या गौतमीच्या एका कार्यक्रमात लहान मुलाच्या डान्सनेच प्रेक्षकांना वेड लावल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या डान्सला प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्या वाजवत दाद दिल्याचे दिसत आहे.

Gangappa Pujari

Gautami Patil Show Video:

आपल्या तडफदार लावणीने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना होणारी तुफान गर्दी नेहमीच चर्चेचा विषय असतो. गावागावात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांची आणि डान्सची चर्चा पाहायला मिळते. अनेकदा गौतमीच्या कार्यक्रमात प्रेक्षकांच्याही डान्सचा जलवा पाहायला मिळतो. सध्या सोशल मीडियावर असाच एका चिमुकल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

लावणी डान्सर गौतमीच्या कार्यक्रमांची, तिच्या जबरदस्त डान्सची सोशल मीडियावर तुफान चर्चा पाहायला मिळते. गौतमी जितकी तिच्या कार्यक्रमांमुळे चर्चेत येते तितकीच तिच्या सोशल मीडिया पोस्टचीही चर्चा होत असते. गौतमीच्या कार्यक्रमात प्रेक्षकांची होणारी गर्दी नेहमीच चर्चेचा विषय ठरतो.

मात्र सध्या गौतमीच्या एका कार्यक्रमात लहान मुलाच्या डान्सनेच प्रेक्षकांना वेड लावल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा चिमुकला गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांमध्ये बसून डान्स करत आहे. त्या चिमुकल्याचा मनसोक्त डान्स पाहून प्रेक्षकही थक्क झालेत. त्याच्या या डान्सला प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्या वाजवत दाद दिल्याचे दिसत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकला प्रेक्षकांमध्ये उभा राहून डान्स करत आहे. त्याच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून प्रेक्षकही थक्क झालेत. व्हिडिओमध्ये मोठ्या स्क्रिनवर गौतमीचा डान्स आणि इकडे प्रेक्षकांमध्ये चिमुकल्याच्या डान्सची हवा पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे स्टेजवर थिरकणारी गौतमीही त्याच्या डान्सला प्रोत्साहन देताना दिसत आहे. दोघांची ही खास जुगलबंदी पाहून प्रेक्षकांचाही उत्साह चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. अनेकांनी त्याच्या या डान्सचे कौतुक केले आहे. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आंदोलकर्त्याला साथ का दिली? जाब विचारत अजित पवारांचा नेता घरात घुसला, दगड- कोयत्याने कुटुंबावर जीवघेणा हल्ला

Highest Grossing Movies : 2025मध्ये 'छावा' चा बोलबाला, सर्वाधिक कमाई करणारे 5 चित्रपट कोणते?

Maharashtra Live News Update: नागपूरमध्ये भरधाव कार नदीत कोसळली, एकाचा मृत्यू

Smartphone Effects: स्मार्टफोनचा झोपेवर दुष्परिणाम! झोपण्यापूर्वी फोन वापरल्याने घटते झोपेचे हार्मोन?

Migraine Solution : मायग्रेनने त्रस्त आहात? या जपानी ट्रिकने मिळेल आराम

SCROLL FOR NEXT