7-year-old girl danced to 'Chaal Sheky-Sheky Sweet gestures won everyone's hearts Saam Tv
व्हायरल न्यूज

चाल शेकी-शेकी गाण्यावर चिमुकलीने केला झकास डान्स;गोड एक्सप्रेशन्सनी जिंकलं सर्वांचं मन

Little Girl Dance Video: चाल शेकी-शेकी गाण्यावर ७ वर्षांच्या चिमुकलीचा जबरदस्त डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तिचे गोड हावभाव, आत्मविश्वासाने भरलेली स्टेप्स पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत.

Tanvi Pol

Trending Video: सध्या सोशल मीडियावर एका चिमुकल्या मुलीचा डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. चाल शेकी-शेकी या प्रसिद्ध मराठी गाण्यावर केलेल्या तिच्या नृत्याने नेटिझन्सचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिचे स्टेप्स, गोड हावभाव आणि निरागस चेहरा पाहून अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारचे डान्स व्हिडिओज सतत ट्रेंडमध्ये असतात, पण या सात वर्षांच्या मुलीने जे सादर केलं आहे, ते खरंच विशेष ठरतं आहे.

कशामुळे व्हिडिओ झाला व्हायरल?

या व्हायरल(Viral) व्हिडिओमध्ये ही चिमुकली सुंदर अशा पोशाखात आहे. त्यानंतर ती या धम्माल मराठी गाण्यावर उत्साहाने आणि अतिशय आत्मविश्वासाने नाचते. डान्स करताना तिचे एक्सप्रेशन्स अगदी व्यावसायिक डान्सरप्रमाणे आहेत. या लहानशा वयात एवढं सुंदर सादरीकरण पाहून नेटकऱ्यांचं लक्ष तिच्यावर खिळून राहिलं

या व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून हजारोंनी ते शेअर केलं आहे. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब अशा विविध प्लॅटफॉर्मवर हा डान्स चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र, हा व्हिडिओ सध्या यूट्युबवरील एका अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. सोशल मीडियावर वारंवार अनेक डान्सचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र हा डान्स व्हिडिओ अनेकांच्या मोठ्या पसंतील आलेला आहे.

व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी कमेंट्समध्ये लिहिलं आहे की, ''या लहानशा वयात इतकं टॅलेंट कुठून येतं?'' तसेच,''हिला जर योग्य मार्गदर्शन मिळालं, तर भविष्यात मोठी नृत्यांगना होईल'' अशा अनेक प्रतिक्रियाही उमटत आहेत. काही जणांनी तर या चिमुकलीला 'लिटल क्वीन ऑफ एक्सप्रेशन्स' असे टायटलसुद्धा दिलं आहे.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! निवडणूक आयोगाच्या पथकाकडून शिंदेंच्या मंत्र्यांची बॅग तपासणी|VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो

Crime News : तुझी शेवटची इच्छा काय? सिगारेट अन् दारू पाजली, नंतर धारदार शस्त्राने वार करत मित्राला संपवलं; हत्याकांडाने पुणे हादरले

Brain Tumor: सतत होणारी डोकेदुखी म्हणजे ब्रेन ट्यूमर तर नाही? न्यूरोसर्जनने सांगितलं कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये

Prajaktaraj: प्राजक्ता माळीने नम्रता संभेरावला दिले खास शिंदेशाही तोडे, PHOTO पाहा

SCROLL FOR NEXT