Indians Dancers Video Grabbed Millions Views Instagram
व्हायरल न्यूज

Chammak Challo Indian Dancer: भावा तुझ्या कलेला कसलीच तोड नाही; ‘छम्मक छल्लो’ गाणं चित्रातून केलं सादर, पाहा Video

Chammak Challo Dance Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या युनिक कंटेंटच्या व्हिडीओ पाहायला मिळतात. अनेक युनिक कंटेंटची नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुद्धा होते.

Chetan Bodke

Indians Dancers Video Grabbed Millions Views

सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच वेगवेगळ्या युनिक कंटेंटच्या व्हिडीओ पाहायला मिळतात. अनेकांच्या युनिक कंटेंटची नेटकऱ्यांमध्ये तुफान चर्चा सुद्धा होताना दिसते. खरंतर भारतामध्ये आपल्यात असलेल्या क्रिएटिव्हीटीला (Creativity) तोड नाही, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीच्या कलेची प्रचंड चर्चा होतेय. त्याने केलेल्या कामाचे नेटकऱ्यांमध्ये तुफान कौतुक केले जात आहे. त्याने एक नाही दोन नाही तर तब्बल ४०६ फ्रेम्स बनवून आपली कला सादर केली आहे. त्याने सादर केलेली कलाकृती पाहून तुम्हीही नक्कीच थक्क व्हाल. (Viral Video)

एका व्यक्तीने सोशल मीडियावर एक नाही दोन नाही तर तब्बल ४०६ फ्रेम्स बनवून आपली कला सादर केली आहे. ही कला सादर करताना त्याने एका बॉलिवूड गाण्यावर हा रील बनवला आहे. सध्या त्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे. (Viral Video)

व्हायरल व्हिडीओमध्ये, एक पिवळ्या साडीमध्ये मुलगी दिसत आहे. शाहरुख खान आणि करीना कपूर खानच्या ‘रा.वन’ (Ra.One) चित्रपटातलं ‘छम्मक छल्लो’ (Chammak Challo Song) या गाण्यावर डान्स करताना ती महिला नाचत असल्याचे दाखवत आहे. (Song)

व्हिडीओमध्ये, एका मुलीचे कागदावर चित्र काढलेले दिसत आहेत. यामध्ये तिने पिवळ्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. त्या मुलीचे चित्र तब्बल ४०६ कागदांवर रेखाचले असून त्यावर तिचे वेगवेगळे चित्र काढलेले दिसत आहे. त्या व्हिडीओमध्ये गाण्यातील स्टेप्स आणि तिने डान्स करताना दिलेले वेगवेगळे हावभाव त्या कलाकाराने रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या त्याच्या कलेचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे. त्या मुलीचे हावभाव आणि डान्स स्टेप्स दाखवण्यासाठी ४०६ कागदांवर तिचे वेगवेगळे चित्र रेखाटले आहे. (Social Media)

गाण्यामध्ये अगदी करीनाने जशा हूक स्टेप्स आणि दिलखेचक अदा दिल्या आहेत. अगदी तशीच अदाकारी त्या कलाकारानेही आपल्या चित्राच्या माध्यमातून हुबेहूब रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. जसं गाणं सुरु होतं, त्या सारख्याच स्टेप्स त्या कलाकाराने कागदावर रेखाटल्या आहेत. हे अनोखं चित्र रेखाटण्यासाठी त्याला २६ दिवस लागले असून प्रत्येक जण त्याच्या कलेचं कौतुक करीत आहे. व्हिडीओच्या शेवटी त्याने ४०६ पानांवर रेखाटलेल्या चित्रांची झलक दाखवली आहे. (Bollywood Film)

कला सादर केलेल्या कलाकाराचे नाव अभिराम असून त्याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. व्हिडीओ पाहून अनेक जणांनी त्याने सादर केलेल्या अद्भुत कलेचे विविध शब्दात कौतुक करताना दिसत आहेत. ७७ लाखांहून अधिक त्या व्हिडीओला व्ह्यूज मिळाले असून ११.१ मिलियन पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूरात ऊस दरासाठी असलेल्या आंदोलनात पोलिसांकडून आंदोलकांना धक्काबुक्की

Methi Thepla Recipe : नाश्त्यासाठी बनवा गुजरात स्पेशल मेथी थेपला, झटपट तयार होते रेसिपी

मुंबईत अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; आता राजकीय दबावाचा नवा वाद, नेमकं काय घडलं?

Success Story: लहानपणी आईवडिलांचे छत्र हरपलं, आजीने मोठं केलं, सलग ५ वेळा अपयश, ६व्या प्रयत्नात IPS; अंशिका जैन यांचा प्रवास

Oldest Forts In India: भारतातील सगळ्यात जूने किल्ले कोणते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT