Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: २४ कॅरेट सोन्याचा केकनंतर बाजारात आलीये २४ कॅरेट गोल्ड दाल,VIDEOपाहून नेटकरी झाले चकीत

Viral Food Video: एका हॉटेलमध्ये साधारण वरण हे साधारण नसुन ते 'गोल्डचे वरण' आहे. सध्या सोशल मीडियावर गोल्ड दाल तूफान व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

24 Carat Golden Take Wali Daal

जगाच्या कानाकोपऱ्यात रोज काहीना काही घटना घडत असतात,त्यांपैकी काही घटना अशा असतात की आपल्याला त्यावर विश्वास ठेवणे फार कठीण असते. त्यातच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात चक्क एका हॉटेलमध्ये साधारण वरण हे साधारण नसुन ते 'गोल्डचे वरण' आहे. सध्या सोशल मीडियावर गोल्ड दाल तूफान व्हायरल होत आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जगात प्रत्येक व्यक्तीला सोने,चांदी तसेच अनेक प्रकारच्या दागिन्यांचे फार वेड असते. सध्या भारतात सोन्याच्या किंमती सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर गेलेल्या आहेत, मात्र अनेक श्रीमंत असे व्यक्ती आहेत ,ज्यांच्याकडे आपल्याला फक्त आणि फक्त सोन्यापासून बनवलेले फोन कव्हर किंवा पूर्ण सोन्याचे कोंटीग असलेली गाडी अशा अनेक वस्तु असतात मात्र २४ कॅरेट गोल्ड दालचा व्हिडिओने प्रत्येकाला आश्चर्यचकित करुन सोडले आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ दुबईमधील असून तेथील मास्टर शेफ रणवीर ब्रार यांच्या कास्कन हॉटेलमध्ये ही आलिशान २४ कॅरेट गोल्ड दाल सादर करण्यात आली आहे. ही डाळ तयार करण्यासाठी २४ कॅरेट सोने आणि उत्तम दर्जाचे मसाले तसेच शुद्ध तूपचा वापर करण्यात आला होता. व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका रेस्टॉरंटमधील आहे,ज्या रेस्टॉरंटमधील मॅनेजर एका खास पद्धतीने २४ कॅरेट गोल्ड दाल रेस्टॉरंटमधील सर्वांना दाखवत आहे.

२४ कॅरेट गोल्ड दाल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील @ streetfoodrecipe या इन्स्टा अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांकडून व्हिडिओवर प्रतिक्रिया मिळत आहेत त्यातील एका यूजरने कमेंट बॉक्ममध्ये लिहिले आहे की,' काय काय बनवतात ही लोक' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,' हे काही तरी वेगळंच आहे',तसेच व्हिडिओला ३ दिवसांत लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून अनेक लाईक्स मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Doctor Stress: डॉक्टरही असतात मानसिक तणावात! जाणून घ्या त्यामागची खरी कारणं

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Shravan Somwar: श्रावणाचा पहिला सोमवार: महादेवाला अर्पण करा या गोष्टी

Marathwada Politics : काँग्रेसला जोरदार धक्का, २ दिग्गज नेत्यांनी 'हात' सोडला, २४ तासांत कमळ हातात घेणार

PM Vishwakarma Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांचे लोन; PM विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT