Uttar Pradesh: यूपीच्या कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. जिथे एका लग्न समारंभातून परतणाऱ्या तरुणीला एका कार चालकाने धडक दिली. संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्हीत कैद झाली असून या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. एवेढच नाही तर या घटनेचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक तरुणी रस्त्याच्या एका कडेने घरी परतत असताना दिसत आहे. मात्र रात्रीची वेळ असल्याने त्या परिसरात नागरिकांची जास्त गर्दी नाही. काही वेळात तरुणी जात असताना तिच्या समोरुन जोरदार वेगात एक कार येते आणि कारची धडक तिला बसते. तरुणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फेकली जाते. या घटनेत तरुणीला किती लागले हे समजू शकलेले नाही मात्र संपूर्ण घटना रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्हीत(CCTV) कैद झालेली आहे.
व्हायरल होत असलेली घटना एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@gharkekalesh'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करताच कॅप्शनमध्ये,''यूपीमध्ये एका लग्न समारंभातून परतणाऱ्या मुलीला एका कार चालकाने धडक दिली'' लिहिले आहे. घडलेल्या घटनेवर सध्या सर्व माध्यमातून नेटकऱ्यांनी हैराणजनक आणि संताप व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया केलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.