Zika Virus News SaamTv
Video

Zika Virus : दादरमधून मुंबईत झिकाची एंट्री; आरोग्य यंत्रणा सतर्क

Mumbai News : झिका विषाणू आता मुंबईमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे मुंबई पालिका आणि आरोग्य यंत्रणेने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Saam Tv

मुंबईमध्ये झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे परिसरात भितीचं वातावरण पसरलं आहे. दादरमधून मुंबईत झिकाची एंट्री झालेली आहे. दादारमधील एका वृद्ध व्यक्तीला झिकाची लागण झाल्याने पालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. राज्यात आतापर्यंत 130 झिकाचे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागात चिंतेचे वातावरण असतानाच आता मुंबईतील दादरमध्ये झिकाचा पहिलं रुग्ण आढळला असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

झिका व्हायरस रोग सामान्यतः सौम्य असतो. सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे सौम्य ताप, त्वचेवर पुरळ, डोकेदुखी, स्नायू, सांधेदुखी आणि पापणीच्या खालच्या बाजूस जळजळ. ही लक्षणे साधारणपणे 2-7 दिवस टिकतात. अशी लक्षणे दिसून आली तर नागरिकांनी तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT