युट्यूबर संतोष पंडितला न्यायालयीन कोठडी saam tv
Video

Pune News : युट्यूबर संतोष पंडितला न्यायालयीन कोठडी, अटकेच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर उडाला होता धुरळा

YouTuber Santosh Pandit sent to judicial custody in Pune : राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी तसेच त्यामुळे भावना दुखावल्याच्या कारणांवरून महिलेच्या तक्रारीवरून अटकेत असलेला युट्यूबर संतोष पंडितला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुण्यात रीलस्टार संतोष पंडितला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पंडितवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि अश्लील मजकूर प्रसारित केल्याचा आरोप आहे. एका महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संतोष पंडितला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.

सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या आरोपातून संतोष पंडितवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संतोष पंडितला अटक करून न्यायालयात हजर केले होते. तपासासाठी न्यायालयाने पंडित याला यापूर्वी ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. ती मुदत संपल्यानंतर आज, मंगळवारी पंडितला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली असून, आता त्याची रवानगी कारागृहात होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगेंच्या आंदोलनादरम्यान शिवसेनेच्या नेत्यांना एकनाथ शिंदेंचा आदेश

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, 'या' शिक्षकांच्या भरतीवर बंदी; शाळा-कॉलेजमध्ये शिकवण्यासाठी लागणार ही पात्रता

Gingee Fort : अभेद्य तटबंदीपासून गूढ इतिहासापर्यंत, १२०० वर्षे जुन्या जिंजी किल्ल्याबद्दल १० आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी

Sambhaji Bhide : दहीहंडी उत्सवात बायका नाचवणारे देशद्रोही; संभाजी भिडेंची खरमरीत टीका

Maharashtra Cabinet: नोकर भरतीचे सुधारित आरक्षण, आरोग्य व्यवस्था; राज्य मंत्रिमंडळाचे ७ धडाकेबाज निर्णय

SCROLL FOR NEXT