Mumbai Mantralay SaamTv
Video

Mumbai Mantralaya : मंत्रालयात झाडावर चढून तरुणाचं आंदोलन | Video

Protest In Front Of Mantralaya : नाशिक जिल्ह्यातील एका तरुणाने आज मुंबईत मंत्रालयात पोहोचून झाडावर चढत आंदोलन केले आहे. विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्याने हे आंदोलन केलं.

Saam Tv

नाशिक जिल्ह्यातील तरुणाने मुंबईत मंत्रालयासमोर झाडावर आज चढून आंदोलन सुरू केलं आहे. गिरनानगर ग्रामपंचायतीच्या सरपंच अनिता पवार यांनी ग्रामपंचायतीत केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी त्याने हे आंदोलन केल्याचं सांगितलं जात आहे.

गिरनानगर गावचा सुनील तुकाराम सोनवणे हा तरुण आज आपल्या मागण्यांसाठी मंत्रालयाजवळ असलेल्या झाडावर चढला होता. मागण्या पूर्ण होत नसल्याने त्याने झाडावर चढून आंदोलन सुरू केलं. गिरनानगर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच अनिता पवार यांनी ग्रामपंचायतीत केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यार यावी अशी मागणी सोनवणे याने केली आहे. त्यासाठी त्याने जिल्हा परिषद, पंचायत समितीकडे तक्रारही केली. मात्र तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने त्याने थेट मंत्रालय गाठत मंत्रालयाच्या मुख्य दरवाजाच्या जवळ असलेल्या झाडावर चढून अर्धा तास आंदोलन केलेलं बघायला मिळालं. त्यानंतर पोलीस प्रशासनाने या ठिकाणी पोहोचून या तरुणाला खाली उतरवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : दहा वर्षे केंद्रात कृषीमंत्री, सहकारासाठी योगदान काय? विखे पाटलांची नाव न घेता शरद पवारांवर टीका

Nag Panchami 2025 : नाग पंचमीच्या तारखेपासून ते पूजेची पद्धत सर्व माहिती घ्या जाणून

Maharashtra Live News Update: युरिया टंचाईमुळे शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Beed Shocking : तरुण डॉक्टरची इंजेक्शन घेऊन आत्महत्या; बीडमध्ये खळबळ

Nashik Honey Trap : नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाची व्याप्ती वाढली; ७२ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह डॉक्टर्स, व्यावसायिक अडकले

SCROLL FOR NEXT