Nanded News Update Saam Tv
Video

Nanded News : आष्टीकरांची गाडी अडवण्याचं कारण काय? पहा व्हिडिओ

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्या स्वागतासाठी जाणारी खासदार नागेश आष्टीकर यांची गाडी नांदेड विमानतळ परिसरात अडवण्यात आली आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

Saam Tv

नांदेड विमानतळ परिसरात खासदार नागेश आष्टीकर यांची गाडी अडवण्यात आल्याने गोंधळ झाला आहे. गाडी अडवल्याचा निषेध करत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

आज खासदार संजय राऊत हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नांदेड विमानतळावर राऊत यांचं आगमन होणार आहे. राऊत यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक नांदेड विमानतळावर मोठ्या संख्येने दाखल झाले. परंतु या सर्व शिवसैनिकांना विमानतळाच्या आत प्रवेश पोलिसांनी नाकारला. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची गाडी देखील यावेळी अडवण्यात आली. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली आहे. शिवसैनिक यावेळी चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले. या सगळ्या घटनेनंतर आता वरिष्ठ नेते आणि पोलिसांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. मात्र या घटनेमुळे शिवसैनिकांमध्ये रोष दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

Maharashtra News Live Update: आंदोलनात सहभागी झाल्याने शिक्षकांचा एक दिवसाची पगार कापणार

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT