PM Modi News SaamTv
Video

Narendra Modi News: पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, संशयित महिला पोलीसांच्या तब्यात

Threat to Prime Minister Narendra Modi: मुंबई पोलीसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारणार असल्याचा धमकी देणारा फोन आज आला आहे. त्याबद्दल अधिक तपास पोलीसांनी सुरू केला आहे.

Saam Tv

मुंबई पोलीसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा प्लॅन तयार झाला आहे, असा दावा धमकीचा फोन करणाऱ्या महिलेने केला आहे. या प्रकरणी पोलीसांनी एका महिलेला तब्यात घेतलं आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच थेट जीवे मारण्याची धमकी आता देण्यात आली आहे. मुंबई पोलीसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला यासंदर्भातील धमकीचा फोन करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांना उडवण्याचा कट असून त्यांना मारण्यात येणार आहे, अशा संदर्भातला हा फोन एका महिलेने केला आहे. त्यानंतर मुंबई पोलीसांनी वेगवान हालचाली करत यासंदर्भात तपास सुरू केला आहे. एका संशयित महिलेला देखील पोलीसांनी तब्यात घेतलेलं आहे. शीतल चव्हाण असं या महिलेचं नाव असून तिची चौकशी पोलीस करत आहेत. तिला याबद्दल नेमकं कोणी माहिती दिली होती, हा कट कुठे रचला जातो आहे, अशी चौकशी आता पोलीसांकडून करण्यात येत आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 7 वर्षांत पगार दुप्पट? वाचा 8व्या वेतन आयोगाचे कॅलक्युलेशन

माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीस यांच्या काकांना विश्वास

Maharashtra News Live Update: कणकवलीत अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक तपासणी

Maharashtra Freedom of Religion Act 2026: राज्यात महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा लागू; उल्लंघन केल्यास ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Kavlya Fort : उंच शिखरावर उभा असलेला 'कावळ्यागड' कधी पाहिला का? सह्याद्रीत लपलेला सुंदर किल्ला

SCROLL FOR NEXT