Women from a self-help group in Wakare village protest after a ₹5 lakh loan fraud surfaced involving fake signatures. saam tv
Video

महिला बचत गटाच्या नावावर ५ लाखांची फसवणूक; बनावट सह्या अन् ...; |VIDEO

Women Self Help Group Fraud In Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात महिला बचत गटाच्या नावावर ५ लाखांची फसवणूक उघड. बनावट सह्या करून कर्ज उचलल्याचा आरोप; महिलांना बँकेकडून वसुली नोटिसा.

Omkar Sonawane

बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाचे स्वप्न पाहणाऱ्या महिलांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात उघडकीस आला आहे. तालुक्यातील वाकरे येथे महिला बचत गटाच्या नावे चक्क ५ लाख रुपयांचा डल्ला मारण्यात आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. महिलांच्या बनावट सह्या करून हे कर्ज उचलण्यात आल्याचा आरोप पीडित महिलांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाकरे येथील मोलमजुरी करणाऱ्या महिलांनी आपला उदरनिर्वाह आणि बचतीसाठी बचत गट स्थापन केला होता. मात्र, या गटातील महिलांना अंधारात ठेवून त्यांच्या बनावट सह्या आणि कागदपत्रांचा आधार घेत ५ लाख रुपयांचे कर्ज काढण्यात आले. विशेष म्हणजे या महिलांनी प्रत्यक्ष कोणतेही कर्ज घेतलेले नसतानाही बँकेकडून त्यांना अचानक वसुलीच्या नोटिसा प्राप्त झाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Fine : वाहतूक नियम मोडणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; थकीत ई-चलन वीज बिलातून वसुल होणार

Maharashtra News Live Update: २ तारखेच्या सीजेपीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा- उद्धव ठाकरे

Raj thackeray: ठाकरे बंधूंचा एल्गार! ४ ऑक्टोबरचा संयुक्त मोर्चा कुठून कुठपर्यंत निघणार? राज ठाकरेंनी सर्वकाही सांगितलं

Sarkari Yojana: ट्रॅक्टर घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून मिळू शकते 50% पर्यंत मदत

Eco-Friendly Nirmalya Collection: गणेशभक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड; गिरगाव चौपाटीवर श्रीसदस्यांकडून निर्माल्य संकलन

SCROLL FOR NEXT