Thane Police Station where the complaint was filed in the sedative-laced cake assault case. Saam Tv
Video

केक खाताच गुंगी आली; महिलेवर कारमध्ये नेऊन बलात्कार, ठाण्यात खळबळ|VIDEO

Woman Drugged With Cake And Assaulted: ठाण्यात महिलेला केकमध्ये गुंगीचं औषध देऊन कारमध्ये सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी फरार आहे.

Omkar Sonawane

ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेला गुंगीचं औषध देऊन सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही गंभीर घटना 25 ऑगस्ट रोजी घडली असून पीडित महिलेने 5 डिसेंबर रोजी ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फॅमिली कोर्टाच्या आवारात उभी असलेल्या चारचाकी वाहनात हिरालाल केदार आणि रवी पवार या दोघांनी केकमध्ये गुंगीचं औषध देऊन महिलेवर अत्याचार केला. या प्रकरणात आरोपी हिरालाल केदारला पोलिसांनी अटक केली असून दुसरा आरोपी रवी पवार हा अद्याप फरार आहे. घटनेनंतर आरोपींनी पीडितेला वारंवार ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचंही तक्रारीत नमूद आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणे नगर पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

SCROLL FOR NEXT