उद्धव ठाकरे Saam tv
Video

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार? महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा

Will Uddhav Thackeray get re-elected to Maharashtra Legislative Council 2026 : उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेत जाणार का? मे २०२६ आधी महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे, महाविकास आघाडीचे संख्याबळ, राज्यसभा निवडणुकीचा परिणाम आणि पुढील रणनीती जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Uddhav Thackeray | MVA Politics : उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपत असून, त्यांच्या पुनर्निवडीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीकडे सध्या असलेल्या संख्याबळाच्या कमतरतेमुळे ठाकरेंची कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एप्रिलमध्ये राज्यसभेच्या ७ जागा रिक्त होत असून, त्यावेळच्या समीकरणांवर ठाकरेंचे विधान परिषदेचे भवितव्य अवलंबून असेल. जर ठाकरेंच्या २० आमदारांनी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस किंवा राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांना पाठिंबा दिला, तर बदल्यात विधान परिषदेची एक जागा ठाकरेंना मिळू शकते. मे महिन्यात विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त होत असून निवडून येण्यासाठी २९ मतांचा कोटा आवश्यक आहे. शरद पवार यांचीही राज्यसभेची जागा रिक्त होत असल्याने, ठाकरेंचा पाठिंबा पवारांना मिळाल्यास ठाकरेंचा विधान परिषदेचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.

Maharashtra Legislative Council election process explained

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्याला मिळाले नवे मुख्यमंत्री, उद्या होणार शपथविधी

Maharashtra Live News Update: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी भीमसैनिक आक्रमक

Madhavi Nimkar Photos: 'जणू आकाशातून अप्सराच अवतरली!' माधवीचं मराठमोळं सौंदर्य पाहून हेच म्हणाल

Weather Update : अकोल्यात सूर्य ओकतोय आग, जगातील उष्ण शहरांच्या यादीत दुसरं नाव; आजचं तापमान किती?

राज्यात उष्णतेचा कहर! सरकारकडून नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी; हे करा-हे टाळा’ SOP गाईडलाईन्स

SCROLL FOR NEXT