Thackeray Family News SaamTv
Video

Raj Thackeray : ठाकरे बंधु एकत्र येणार? राज ठाकरेंनी बैठकीत काय केल्या सूचना, पाहा Video

MNS Meeting News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बैठकीत मनसे नेत्यांना मनपा निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीत कोणासोबत युती करायची यावर देखील चर्चा झाली आहे.

Saam Tv

मनपा निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे. पक्षाची कामं जनतेपर्यंत पोहोचवा आणि निवडणुकीच्या कामाला लागा असे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत. आज राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांची बैठक् बोलावली होती. यावेळी त्यांनी या सूचना केल्या आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर आता राज ठाकरे यांनी मनपा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. यासाठी आज त्यांनी मनसे नेत्यांची बैठक घेतली आहे. या बैठकीत त्यांनी मनपा निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. तसंच संघटना बळकट करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत जे झालं ते विसरा, मनपा निवडणुकीच्या तयारीला लागा असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. लवकरच पक्ष संघटनेत बदल करण्यात येणार आहे. पालिका निवडणुकी आधी मनसेची टीम राजकीय आढावा घेणार आहे. कोणत्या राजकीय पक्षाशी युती करायची यावरही चर्चा केली जाणार आहे, असं राज ठाकरे यांनी या बैठकीत नेत्यांना सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT