Sunetra Pawar Aditi Tatkare Sanjay Raut maharashtra Politics  saam tv
Video

Sunetra Pawar : फडणवीस हे शिंदेंऐवजी सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करतील; राऊतांच्या विधानानं महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा

Sunetra Pawar CM speculation Maharashtra politics : सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री व्हाव्यात, असं मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या होत्या. त्यावर फडणवीस हे शिंदेंऐवजी सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करतात की काय ? असं सूचक विधान ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत यांनी केलं.

Nandkumar Joshi

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू झाली आहे. सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री व्हाव्यात, अशी इच्छा फडणवीस सरकारमधील मंत्री आदिती तटकरे यांनी बोलून दाखवली. त्यावर ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत यांनी सूचक विधान केले आहे. फडणवीस हे त्यांचा वारसदार म्हणून एकनाथ शिंदे यांच्याऐवजी सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करतात की काय, असं राऊत म्हणाले.

आदिती तटकरे काय म्हणाल्या?

अजितदादांना आम्ही नेहमी मुख्यमंत्री म्हणून बघत आलो. कदाचित आमचे सगळ्यांचे दुर्दैव असेल की, अजितदादांसारखा मुख्यमंत्री राज्याला लाभू शकला नाही. सुनेत्राकाकींच्या माध्यमातून तुम्ही (कार्यकर्ते) बघितलेले स्वप्न पूर्ण होईल, असे आदिती तटकरे एका कार्यक्रमात म्हणाल्या.

तर आमच्या सर्वांचं, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे स्वप्न होतं की अजितदादा एकदा तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे. त्याच धर्तीवर सुनेत्राताईंनी एकदा तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे, अशी आमची सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून इच्छा आहे, असं विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले.

संजय राऊतांचे सूचक विधान

अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. पण सुनेत्रा पवार यांना भाजप मुख्यमंत्री करणार असेल, तर त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाण्याआधी त्यांचा वारसदार म्हणून एकनाथ शिंदेंऐवजी सुनेत्रा पवारांची निवड करतात की काय, असं मला यांच्या बोलण्यातून जाणवतंय, असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: स्कॉर्पिओ नको, इनोव्हा हवी! BMC मध्ये महागड्या गाड्यांची उधळपट्टी, वाहन खरेदीवरून राजकारण तापले

Maharashtra News Live Update: कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस

Monsoon : पावसाळ्यात गादी, उशी अन् बेडवर ढेकणांचा सुळसुळाट? स्वयंपाकघरातील 'हा' एक पदार्थ करेल कमाल

Gold Price Today : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, प्रति तोळा इतक्या रुपयांनी स्वस्त; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर

Thigh size: मांडीचा आकार सांगतो तुम्ही किती वर्षे जगणार? नव्या संशोधनातील धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT