Bachchu Kadu - Eknath Shinde News Update saam tv
Video

Bachchu kadu : बच्चू कडूंचा पक्ष शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार? काय म्हणाले 'प्रहार'चे कार्यकर्ते? VIDEO

Prahar Janshakti Party Merger With Shinde Sena Buzz Grows In Maharashtra : बच्चू कडू यांची प्रहार जनशक्ती पक्ष शिंदेंच्या शिवसेनेत विलीन करणार का? याबाबत वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. याबाबत 'प्रहार'चे कार्यकर्ते काय म्हणाले?

Nandkumar Joshi

अमर घटारे, अमरावती | साम टीव्ही

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानपरिषदेवर संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र, कडूंना त्यांचा पक्ष शिवसेनेत विलीन करण्याची अट घालण्यात आली आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, आपण कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेऊ, अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे. यावर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

बच्चू कडू जो निर्णय घेतील, तो निर्णय आम्हाला मान्य असून, त्यांच्या पाठिशी आम्ही भक्कमपणे उभे राहू, असे अमरावतीमधील प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. कडू यांनी शेतकरी, दिव्यांगांसाठी काम केले आहे. सरकारमध्ये जाऊनही ते आधीसारखेच काम करतील, असा विश्वासही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडूंना पक्ष विलीनीकरणाची अट घातली असेल असे वाटत नाही, असं काही कार्यकर्ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्य राखीव पोलीस दलाच्या परीक्षेतही घोळ; प्रश्नपत्रिकेत आले एकाच पुस्तकातील 100 पैकी 85 प्रश्न

'मुन्नाभाईंची लातूर फॅक्टरी; कुलकर्णीनंतर CBIच्या मोटेगावकरला बेड्या,10 दिवसांआधीच मिळाला होता NEET चा पेपर?

Fact Check: 2 दिवसांत भारतातील पेट्रोल संपणार? युद्धामुळे देशावरील इंधनाचं संकट वाढलं?

पार्टनरची साथ मिळेल, मानसिक तणाव कमी होईल; ५ राशींच्या लोकांसाठी सोन्यासारखा दिवस ठरणार

Crime: भयंकर! लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, झाडाला बांधून अल्पवयीन मुलीचे दोन्ही स्तन कापले

SCROLL FOR NEXT