Sushant Singh Rajput  Saam Tv News
Video

Video: सुशांत सिंह प्रकरणात CBI गप्प का? काँग्रेस नेते सचिन सावंत यांचा सवाल

या भाजपाच्या कुटील राजकारणासाठी तीन तीन राष्ट्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग झाला. मुंबई पोलिसांची बदनामी झाली.

Rachana Bhondave

सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूचे कारण आत्महत्या आहे असा निर्वाळा मुंबई पोलिसांनी दिल्यानंतर महाराष्ट्रात सीबीआय तपासाला बंदी आहे. हे पाहून अत्यंत चुकीच्या पद्धतीने बिहार पोलिसांच्या माध्यमातून बिहार मध्ये झीरो एफ आय आर नोंदवून सीबीआयकडे तपास सोपविण्यात आला. आज या तपासाला ४ वर्षे म्हणजेच १४६० दिवस उलटले तरी सीबीआय गप्प का? एम्स सारख्या प्रथितयश संस्थेने आपल्या अहवालात सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला हा निर्वाळा दिला त्याला १४०० दिवस उलटले तरी सीबीआय गप्प का? सुशांतच्या बहिणीने साक्षात मोदीजींना विनंती केली आहे की त्यांनी हस्तक्षेप करावा व सीबीआयचे तोंड उघडावे. पण ना मोदीजींनी हस्तक्षेप केला ना सीबीआयचे तोंड उघडले. आम्ही जो आरोप सातत्याने करत होतो की भाजपा सुशांतच्या मृत्यूचा बिहार निवडणूक व मविआ सरकारला बदनाम करण्यासाठी वापर करत आहे हेच सत्य सिध्द होत आहे. या भाजपाच्या कुटील राजकारणासाठी तीन तीन राष्ट्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग झाला. मुंबई पोलिसांची बदनामी झाली. सुशांतच्या कुटुंबियांना वेठीस धरले गेले. अनेकांना त्रास दिला गेला. आता सीबीआयची बदनामी होत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Liefspan: बिबट्या किती वर्षे जगतो?

Post Office: पोस्टात जाण्याची झंझट संपली, आता मोबाईलवरूनच होणार सर्व कामं; Dak Seva 2.0 अ‍ॅप कसे वापरायचे?

Maharashtra Live News Update : नाशकात २० हजार कोटींपेक्षा जास्त कामे हाती घेतली आहेत - देवेंद्र फडणवीस

Shocking News : 'मी तुझ्या वडिलांचा खून ..' नवऱ्याची हत्या करून बॅगेत भरलं; बायकोनं थेट मुंबई गाठली अन्..

वर्गात ‘जय श्रीराम’चा नारा दिल्याने मुस्लिम शिक्षकाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण|VIDEO

SCROLL FOR NEXT