MVA CM Face Saam Tv
Video

MVA CM Face: मविआचा मुख्यमंत्री कोण? संजय राऊतांकडून वेळ, तारीख जाहीर

Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्री कोण यावरून मविआत अनेकदा खडाजंगी झालीय. मात्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मविआचा मुख्यमंत्री कोण हे जाहीर करण्यासाठी तारीख आणि वेळ सांगितलीय.

Tanmay Tillu

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरुन बरीच रस्सीखेच रंगल्याचं पाहायला मिळालं..त्यावरुन महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरून कोणताही वाद नाही आणि याचा निर्णय निवडणुकीनंतर घेतला जाईल असं देखील सांगितलं गेलं. मात्र सातत्यानं शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केलं. आता पुन्हा संजय राऊतांनी मुख्यमंत्री कोण होणार हे मी सांगणार असल्याचं म्हटलंय..त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात....

मविआ सरकार स्थापनेवेळी मुख्यमंत्री होण्यास इच्छुक नव्हतो असा दावा उद्धव ठाकरेंनी केला होता..शरद पवारही याला दुजोरा देतात आणि आपल्या आग्रहामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचंही सांगतात. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मविआचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यासाठी ठाकरे गटालाच सर्वाधिक घाई झालीये हे वेळोवेळी पाहायला मिळालंय..त्यात आता संजय राऊतांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य करताना तारीख,वेळ जाहीर केलीये. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरेच होणार असा सुप्त इशारा राऊत देतायत का? आणि मविआतील इतर दोन पक्ष यासाठी तयार होणार का ? की यावरुन मविआत बिघाडीत होणार याची उत्तर 23 नोव्हेंबरलाच मिळतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : नकटं असावं, धाकटं नसावं! महायुती-मविआत शिवसेना दोन आकड्यांवर, VIDEO

Cm Shinde: मुख्यमंत्री गुवाहाटीला का जातात? कामाख्या शिंदेंना पावणार?

Madha Constituency : माढ्याचं महाभारत! मतदारसंघात 2 रणजितसिंह आमने-सामने येणार? VIDEO

Maharashtra Election: बारामतीत काकाविरुद्ध पुतण्या भिडणार? युगेंद्र पवारांची अजित पवारांशी लढत?

Mahim Assembly Constituency : 'राज'पुत्र चक्रव्यूहात? माहिम मतदारसंघात पुतण्याची काकांकडून कोंडी? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT