Mahayuti News SaamTv
Video

Maharashtra CM : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?

Mahayuti News : राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार यावरून आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Saam Tv

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, शिंदे की फडणवीस? यावरून आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र भाजप एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदासाठी नाही म्हणण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसंच अजित पवार यांच्या आमदारांचा देखील पाठिंबा असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महायुती सरकारचा मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय थेट दिल्लीतून होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान, हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडूनच हा निर्णय घेतला जाईल अशीही माहिती भाजपमधल्या एका मोठ्या नेत्याने दिली आहे. त्यामुळे एकंदरीतच राज्याच्या राजकारणात खलबतं सुरू झाली आहे. एकीकडे फडणवीस यांना संघ आणि अजित पवार यांच्या आमदारांचा पाठिंबा आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा हातभार महत्वाचा आहे. त्यामुळे शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशी मागणी देखील होत आहे. यामुळे आता राज्याचं मुख्यमंत्रिपद कोण भूषवणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diesel Crisis: परभणीत डिझेलची टंचाई, पेट्रोल पंपाबाहेर कॅन घेऊन रांगा; पाहा VIDEO

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी ५५८ कोटींचं बक्षीस, जागतिक राजकारणात मोठी खळबळ

IPL 2026: RCBlचं प्लेऑफमधील तिकीट कन्फर्म; पंजाबच्या पराभवानंतर २ संघांची 'चांदी', कसे असणार स्पर्धेचं समीकरण?

Pune News: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, पण बाहेर आलेच नाहीत; पुण्यात तिघांचा बुडून मृत्यू

ATM मशिन गंडलं, नागरिकांची लॉटरी, 400 रुपयांची मागणी, मिळाले 2 हजार

SCROLL FOR NEXT